गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश

By admin | Published: September 12, 2016 02:47 AM2016-09-12T02:47:02+5:302016-09-12T02:47:02+5:30

गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनुभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत.

The Message of the Holy Mother Teresa | गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश

गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश

Next

मुख्यमंत्री फडणवीस : मदर तेरेसा यांच्या पुतळ्याचे अनावरण
नागपूर : गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनुभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत. त्यांचे कार्य जगाच्या ५२ देशात सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा हाच संत मदर तेरेसाच्या जीवनाचा संदेश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कामठी रोडवरील सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रालच्या प्रांगणात मदर तेरेसा यांना संत ही सर्वोच्च पदवी बहाल केल्याबद्दल आयोजित संत समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

रंजल्या गांजल्यांसाठी समर्पित जीवन - नितीन गडकरी
संत मदर तेरेसा या ममतेच्या सागर होत्या. त्यांचे जीवन रंजल्या गांजल्यासाठी समर्पित होते. जात धर्म पंथ भाषेच्या पलिकडे जाऊन काम करावे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्या प्रमाणे ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या मार्गावर मदर तेरेसा चालल्या आणि त्यांना संतत्व बहाल झाले. सेवेसाठी कुठल्याही देशाच्या सीमा आडव्या येत नाही. त्यांचे कार्य जगभर होते, असेही गडकरी म्हणाले.
प्रास्ताविक आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा यांनी केले. पत्रकार जोसेफ राव यांनी परिचय करून दिला. संचालन फादर प्रशांत यांनी केले तर सिस्टर कुरिया कोसा यांनी आभार मानले. यावेळी बिशप पॉल दुपारे, रेव्हरंट फादर क्रिस्टोफर, नेल्सन फ्रान्सिस, फिलिप्स जैसवाल, पिटर घाटगे, गुरुद्वाराचे गुरुग्रंथी मनदीप सिंग, मौलाना पारेख, अर्चना सिंग उपस्थित होत्या.

Web Title: The Message of the Holy Mother Teresa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.