३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:08 AM2017-10-02T01:08:26+5:302017-10-02T01:08:38+5:30

‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.

A message of the Samiti given by 300 students | ३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

Next
ठळक मुद्देधम्मसंदेश अभियान : पथनाट्यामधून पोहचविले बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. धम्मसंदेश अभियानाच्यावतीने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपºयातून आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर येणाºया या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, त्यांनी केलेला त्याग आणि दिलेल्या विचारांची माहिती व्हावी, म्हणून ‘धम्मसंदेश अभियान’च्यावतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची माहिती देताना माजी अतिरीक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे म्हणाले, ‘दीक्षाभूमी ही आहे आमचे प्रेरणा स्थान, नका करू याला तीर्थस्थान’, या विचारामधूनच दरवर्षी नव्या विषयाला घेऊन पथनाट्य उभे केले जाते . या अभियानाचे हे सहावे वर्ष आहे. पथनाट्यामध्ये तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज आॅफ सोशल वर्क, बी.पी. नॅशनल समाजकार्य महाविद्यालय, आॅरेंज सिटी कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय आदींचा सहभाग होता. दीक्षाभूमी सोबतच शहरातील विविध बुद्ध विहारातही व मोठ्या कार्यक्रमस्थळी हे पथनाट्य सादर केले जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने नवीन पिढी आंबेडकरी चळवळीशी जुळत आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाबराव वानखेडे, प्रा. प्रदीप आगलावे, प्रा. सुनील तलवारे, राजेश हाडके, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रशांत तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: A message of the Samiti given by 300 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.