कलम १४४ च्या काळातही होणार मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:09+5:302021-04-15T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळात मीटर वाचन झाले नव्हते, बिले वाटण्याची प्रक्रियाही थांबली होती. त्याचा ...

Meter reading will also be done during section 144 | कलम १४४ च्या काळातही होणार मीटर रीडिंग

कलम १४४ च्या काळातही होणार मीटर रीडिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळात मीटर वाचन झाले नव्हते, बिले वाटण्याची प्रक्रियाही थांबली होती. त्याचा परिणाम सरसकट बिले देण्यात झाल्याने वीज ग्राहकांकडून प्रचंड ओरड झाली होती. हा अनुभव लक्षात घेऊन सध्या लागू करण्यात आलेल्या कलम १४४ च्या प्रभावामध्येही मीटर वाचन करण्याचे आणि बिले देण्याचे काम सुरूच राहणार आहे.

या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, वीज पुरवठा आणि या सोबत संबंधित असलेली सर्व कामे अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे या वेळी ही सर्व कामे सुरू राहतील. एवढेच नाही तर ग्राहकांनाही आपल्या मीटरचे रीडिंग पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

महावितरणच्या मते, वीज वितरण कंपनीची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता बिलिंग प्रक्रिया कायम ठेवणे गरजेचे आहे. फक्त एक कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेईल आणि बिल देईल. मात्र रीडिंग करणाऱ्या आणि बिल वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मते, कोरोना संक्रमणाच्या काळात घरोघरी जाऊन ही सेवा देणे म्हणजे धोक्याला निमंत्रण देण्यासारखे आहे.

...

बॉक्स

मनपाला पत्र, परवानगी मागितली

महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून १५ एप्रिलनंतरही बिलिंगचे काम नियमित सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे. वीज पुरवठा ही अत्यावश्यक सेवा गणली गेली आहे. त्यामुळे ती नियमित ठेवणे गरजेचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

...

Web Title: Meter reading will also be done during section 144

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.