विषाणूंच्या आजारांसोबत जगण्याची पद्धत स्वीकारावी लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:10+5:302021-07-05T04:07:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजारांचे विषाणू हा कधीही न संपणारा विषय आहे. विषाणूमुळे होणारे आजार भविष्यातदेखील राहतील. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजारांचे विषाणू हा कधीही न संपणारा विषय आहे. विषाणूमुळे होणारे आजार भविष्यातदेखील राहतील. त्यामुळे त्यांच्यासोबतच आयुष्य जगण्याच्या पद्धतीने आपल्याला स्वीकारावे लागेल, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘कोरोना सद्यस्थिती, लसीकरण आणि संभाव्य धोका’ या ऑनलाईन विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, नागपूर येथील सुप्रसिद्ध पल्मोनोलॉजीस्ट डॉ. अशोक अरबट, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे होते. सोबतच उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, ॲड. गजानन पुंडकर, कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, माजी न्यायाधीश अशोक ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य नरेश पाटील, प्राचार्य अमोल महल्ले, डॉ. पी. एस.वायाळ उपस्थित होते. कोरोनावर कशा पद्धतीने उपचार करायचे याची माहिती नसताना खडतर परिस्थितीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम केले. या विषाणूवर मात करण्यासाठी लसींचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे, असे डॉ.गावंडे यांनी सांगितले.
कोरोनावर अद्यापही परिपूर्ण औषधी उपलब्ध नाहीत. म्युटेशनमुळे औषधांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविणे व लसीकरण करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचे डॉ.अरबट यांनी सांगितले. हेमंत काळमेघ यांनी प्रास्ताविक केले. डॉ.मंदा नांदूरकर यांनी संचालन केले तर शेषराव खाडे यांनी आभार मानले.