मोबाईल अ‍ॅपद्वारे नागपूर मेट्रोचा प्रवास होणार सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:03 PM2019-02-28T12:03:53+5:302019-02-28T12:04:37+5:30

वासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे मोबाईल अ‍ॅपच्या (अप्लिकेशन) माध्यमातून प्रवाशांना शहरात कुठेही सहज प्रवास करता येणार आहे.

The Metro is easy to travel through mobile app | मोबाईल अ‍ॅपद्वारे नागपूर मेट्रोचा प्रवास होणार सोपा

मोबाईल अ‍ॅपद्वारे नागपूर मेट्रोचा प्रवास होणार सोपा

Next
ठळक मुद्देमेट्रो स्टेशन, प्रवासी दर, मार्गिका, वेळापत्रक, पार्किंगची माहिती मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोतर्फे मोबाईल अ‍ॅपच्या (अप्लिकेशन) माध्यमातून प्रवाशांना शहरात कुठेही सहज प्रवास करता येणार आहे. अ‍ॅप नागरिकांना अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोनच्या अ‍ॅप स्टोरवरून सहजरित्या डाऊनलोड करता येणार आहे.
अ‍ॅपसाठी कोणतेही शुल्क नागरिकांना द्यावे लागणार नाही. अ‍ॅप इंटरनेट आणि जीपीआरएसवर चालणार आहे. जीपीएसच्या सहाय्याने महामेट्रो नागपूर आणि इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. महामेट्रो आपल्या प्रवाशांसाठी यूजर फे्रंडली स्मार्टफोन मोबाईल अप्लिकेशन लॉन्च करण्यास सज्ज आहे.
अ‍ॅप स्टोरवरून अ‍ॅप डाऊनलोड करताच अ‍ॅपवर देण्यात आलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना मेट्रोचे तिकीट सहज खरेदी करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे महाकार्डचे रिचार्जसुद्धा याच अ‍ॅपने करणे शक्य आहे. नेव्हिगेशनच्या माध्यमातून जवळच्या मेट्रो स्टेशनची आणि स्टेशनजवळच्या पर्यटन स्थळाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.
तसेच मेट्रो प्रवासाचे दर, मेट्रो मार्ग (रुट मॅप), नकाशा, मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक, पार्किंग इत्यादी संबंधित सर्व माहिती अ‍ॅपवर उपलब्ध असेल. याशिवाय महामेट्रोच्या सायकल, ई-सायकल, ई-रिक्षा, ई-स्कूटर, आॅटो-रिक्षा, टॅक्सी, बस व इतर सार्वजनिक वाहतूक संबंधित सर्व माहिती नागरिकांना या माध्यमाने सहज मिळेल.
मल्टी मॉडेल इन्टिग्रेशनच्या (एमएमआय) माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने शहरात निर्माणाधीन नागपूर प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून, लवकर महामेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवेला सुरुवात करणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना सहज आणि सोयीस्कर प्रवास या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल. महामेट्रो नागपूर प्रकल्पातील प्रमुख घटकांपैकी एक मल्टी मोडल इन्टिग्रेशन किंवा फीडर सर्व्हिस नेटवर्क आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.

Web Title: The Metro is easy to travel through mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो