नागपुरात  मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ : १८,०७७ नागरिकांनी केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:30 AM2020-02-11T00:30:23+5:302020-02-11T00:32:15+5:30

महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

Metro passenger increase by 11 percent |  नागपुरात  मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ : १८,०७७ नागरिकांनी केला प्रवास

 नागपुरात  मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ : १८,०७७ नागरिकांनी केला प्रवास

Next
ठळक मुद्देएका दिवसात ३.२५ लाखाचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी १८,०७७ नागरिकांनी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गावर मेट्रोने प्रवास केला. यातून ३.२५ लाखाचे उत्पन्न महामेट्रोला प्राप्त झाले आहे. ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किवा वासुदेव नगरपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये मोजावे लागत असून, सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये मोजावे लागतात. मुख्य म्हणजे मेट्रोने आता शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी प्रवास करू लागले आहेत.
लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा मोठा फायदा झाला आहे. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून प्रवास करीत आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवर जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील झाशी राणी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, सुभाषनगर, वासुदेवनगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनवर सेवा उपलब्ध आहे.

Web Title: Metro passenger increase by 11 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.