मेट्रो रेल्वे आज रुळावर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:21 AM2017-09-30T01:21:03+5:302017-09-30T01:21:38+5:30
जवळपास २७ महिन्यानंतर अर्थात शनिवार ३० सप्टेंबर दसºयाला मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मिहान डेपो (मिहान), वर्धा रोड येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जवळपास २७ महिन्यानंतर अर्थात शनिवार ३० सप्टेंबर दसºयाला मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मिहान डेपो (मिहान), वर्धा रोड येथे मेट्रो रेल्वेला दुपारी १२ वाजता हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, महापौर नंदा जिचकार, खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. जोेगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मिलिंद माने आणि आ. समीर मेघे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित राहतील. यावेळी मेट्रो रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी उपयुक्त स्टेट बँकेच्या ओपन लूप कार्ड अर्थात महाकार्डचे उद्घाटन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते होणार आहे.