मेट्रोची चाके सात-आठ मिनिटांकरिता ठप्प; महापारेषणच्या मानकापूर सब-स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 10:34 PM2023-07-12T22:34:45+5:302023-07-12T22:35:33+5:30

Nagpur News मानकापूर येथील महापारेषणच्या १३२ केव्ही सब-स्टेशनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा थेट परिणाम मेट्रो रेल्वेच्या सेवेवर पडला. ८ ते ९ मिनिटे मेट्रो सेवा ठप्प राहिल्याचे सांगितले जाते.

Metro wheels stopped for seven-eight minutes; Technical failure at Mahapareshan's Mankapur sub-station | मेट्रोची चाके सात-आठ मिनिटांकरिता ठप्प; महापारेषणच्या मानकापूर सब-स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड

मेट्रोची चाके सात-आठ मिनिटांकरिता ठप्प; महापारेषणच्या मानकापूर सब-स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड

googlenewsNext

नागपूर : शहरातील वीज पुरवठा व्यवस्था अतिशय बिघडली आहे. बुधवारी तर वीज पुरवठा बंद झाल्याने मेट्रो रेल्वेची चाके अचानक थांबली. मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर येथील महापारेषणच्या १३२ केव्ही सब-स्टेशनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा थेट परिणाम मेट्रो रेल्वेच्या सेवेवर पडला. ८ ते ९ मिनिटे मेट्रो सेवा ठप्प राहिल्याचे सांगितले जाते.

बुधवार असल्याने हिंगणा ते मानकापूर सब स्टेशनपर्यंत वीज पुरवठ्याच्या एका लाइनवर दुरुस्तीच्या नावावर शटडाउन घेण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण लोड दुसऱ्या लाइनवर होता. परंतु दुपारी १२.१५ वाजता वाढलेल्या लोडमुळे ही लाइन ठप्प झाली. त्यामुळे मानकापूर सब स्टेशनवरून वीज पुरवठा होणाऱ्या वस्तीतील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास ३० मिनिटानंतर लोड व्यवस्थापन करीत वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, वीज नसल्यामुळे मेट्रो रेल्वे सेवासुद्धा ठप्प झाली. महापारेषणने वीज पुरवठ्यासाठी २० मिनिटांचा वेळ मागितला होता. त्यामुळे महामेट्रोने ट्रॅक्शन लाइनचा वापर करीत ८ ते ९ मिनिटात मेट्रो सेवा पूर्ववत केली. १२.२३ वाजता लाइन वन व १२.२४ वाजता लाइन २ वर मेट्रोची सेवा सुरू झाली.

विद्युत भवनही अंधारात

वीज पुरवठा ठप्प झाल्याचा फटका बुधवारी वीज कर्मचाऱ्यांनाही बसला. काटोल रोड येथील विद्युत भवनाची वीज गेल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंधारात राहावे लागले. कामकाज ठप्प झाले. महावितरणच्या ११ केव्ही क्षमतेच्या बिजलीनगर सब स्टेशनसह सेमिनरी हिल्स, गोरेवाडा, नागभवन, मानकापूर, काटोल रोड, एमआरएस, आंबेडकर, गोविंदभवन, एएफओ सब स्टेशन ठप्प पडले. परिणामी याच्याशी जुळलेल्या वस्त्यांमधील वीज पुरवठाही खंडित झाली.

Web Title: Metro wheels stopped for seven-eight minutes; Technical failure at Mahapareshan's Mankapur sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो