सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:01 PM2019-07-25T21:01:21+5:302019-07-25T21:03:48+5:30

वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे.

Metro will run soon on Sitabuldi Hingana route | सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार 

सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार 

Next
ठळक मुद्दे ११ कि़मी.रूळाचे काम पूर्ण : रशियातून रुळाची आयात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. यासोबतच ओएचई केबलचे कार्य अंतिम टप्प्यात असून, लवकरच या ठिकाणी विद्युत लाईन चार्ज केल्या जाईल. ओएचई विद्युत केबलमुळे मेट्रो रेल्वे चालण्यास मदत होते.
प्रकल्पात १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रुळ वापरण्यात आले आहेत. या रुळाची निर्मिती अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येते. त्यामध्ये रुळाच्या वरचा थर बळकट बनविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येते. त्यामुळे रुळाचे आयुष्य जास्त असते आणि देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो. या रुळाचे आयुष्य जास्त असते व देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होतो. आरडीएसओने (अनुसंधान अभिकल्प आणि मानक संघटन) मेट्रोच्या कामासाठी ६० किलो १०८० एचएच रुळाचा वापर अनिवार्य केला आहे. रुळाचा वरचा थर कडक असल्यामुळे रेल्वेच्या चाकांना आधार मिळतो आणि स्थिरता प्रदान करते. एक कि़मी. ट्रॅक निर्मितीसाठी १२० टन रुळाची आवश्यकता असते. इतर मेट्रोमध्ये रुळाची लांबी १८ मीटर आहे. तर नागपूर मेट्रोमध्ये देशात पहिल्यांदाच २५ कि़मी. लांबीचे रुळ वापरण्यात आले आहेत. नागपूर मेट्रोने रशियावरून रुळाची आयात केली आहे.
हे रुळ एवराज कंपनीच्या वेस्ट सायबेरियन मेटॅलर्जिकल कारखान्यात तयार करण्यात आले असून, तो रशियातील सर्वात मोठा रुळ तयार करणारा कारखाना आहे. रुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ध्वनिलहरी चाचणी, प्रोफाईल मापन, विद्युत तपासणी, अल्ट्रासोनिक चाचणी, बार कोडिंग इत्यादी प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नागपूर मेट्रोने रुळाच्या चाचणी आणि निरीक्षणाकरिता जगातील सर्वोत्कृष्ट चाचणी आणि ऑडिटिंग एजन्सी एसजीएस वोस्तोंकला नियुक्त केले आहे.

Web Title: Metro will run soon on Sitabuldi Hingana route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.