मेट्रोचा कामठी मार्गावरील ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उद्यापासून सुरू होणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 3, 2024 06:58 PM2024-10-03T18:58:12+5:302024-10-03T19:00:24+5:30

५.६७ किमी : ५७३ कोटींची गुंतवणूक; गड्डीगोदाम ते आॅटोमोटिव्ह चौक

Metro's 'double decker' flyover on Kamthi Marga will start tomorrow | मेट्रोचा कामठी मार्गावरील ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उद्यापासून सुरू होणार

Metro's 'double decker' flyover on Kamthi Marga will start tomorrow

नागपूर : एलआयसी चौक ते आॅटोमोटिव्ह चौक ५.६७ किमी लांबीचा चार पदरी डबल डेकर उड्डाणपूल ५ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. कामठीहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येईल. त्यामुळे वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे. उभारणीसाठी ‘रिब अ‍ॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. बांधकाम अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड होते. विशेषत: गड्डीगोदाम येथे असलेला भूमिगत मार्गावर वाहतूक आणि रेल्वे मार्गावर सतत रहदारी असल्यामुळे भारतीय रेल्वेकडून एकूण २४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, आॅटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत. 

स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण

५.६७ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल सर्वाधिक लांबीचा असून  सिंगल कॉलम पिल्लरवर उभा आहे. स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण आहे. उड्डाणपूलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिनी पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे. गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. देशातील ही पहिली रचना असून त्यामध्ये चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. वर्धा आणि कामठी या दोन्ही बहुस्तरीय मार्गाची बेरीज केली तर महामेट्रोने सुमारे नऊ किमीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे.  
गड्डीगोदाम येथे चारस्तरीय वाहतूक व्यवस्था

महामेट्रोने भारतीय रेल्वे ट्रॅकवर ८० मीटर लांब आणि १६५० टन वजनाचे स्टील गर्डर लाँच केले. हा अनोखा रेकॉर्ड आहे. ८०० टन वजनाच्या स्टील गर्डरला ३२ हजार एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला. संपूर्ण स्ट्रक्चरसाठी ८० हजार बोल्टचा वापर करण्यात आला. जमिनीपासून स्टील गर्डरची उंची २५ मीटर आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच २२ मीटर रूंद स्टील गर्डर स्थापन करण्यात आले.

Web Title: Metro's 'double decker' flyover on Kamthi Marga will start tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर