म्हाडा कॉलनीच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:18 AM2019-04-12T01:18:22+5:302019-04-12T01:19:18+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यादरम्यान लाखो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र यावेळी झिंगाबाई टाकळी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी मतदान करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार येथे राहणाऱ्या जवळपास ३८ कुटुंबीयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. २५ वर्षापासून कॉलनीसाठी रस्ता आणि नागरी सुविधा नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

Mhada Colony Citizens boycott voting | म्हाडा कॉलनीच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

म्हाडा कॉलनीच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

Next
ठळक मुद्देनागरी सुविधा न मिळाल्याने घेतला निर्णय : १५० नागरिकांनी केले नाही मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यादरम्यान लाखो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र यावेळी झिंगाबाई टाकळी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी मतदान करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार येथे राहणाऱ्या जवळपास ३८ कुटुंबीयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. २५ वर्षापासून कॉलनीसाठी रस्ता आणि नागरी सुविधा नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
येथील रहिवासी मिहिर पानतावणे यांनी सांगितले की १९९५ पासून ही कॉलनी वसलेली आहे. वस्तीच्या ले-आऊटनुसार म्हाडा कॉलनीला जोडणारे दोन रस्ते मंजूर आहेत. मात्र सत्यपरिस्थिती वेगळीच आहे. गेल्या २५ वर्षापासून येथील नागरिक रस्त्याची प्रतीक्षाच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा कार्यालय व नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी असंख्य बैठका घेण्यात आल्या, अनेकदा निवेदने सादर करण्यात आली. अनेकदान आंदोलन आणि उपोषणावर बसले. मात्र प्रशासनाने नागरिकांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आरटीआयद्वारे प्राप्त माहितीनुसार म्हाडा कॉलनीच्या खसरा क्रमांक २०९ व २१० साठी १२ मीटरचा रोड मंजूर आहे. मात्र योजनेनुसार दोन्ही संस्थांनी रस्ता तयार करण्यासाठी काहीच केले नाही. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी मानकापूर रस्ता चोरीला गेल्याची तक्रारही दाखल केली होती. आम्ही आमच्या प्रयत्नाने रस्ता तयार केला असता, मात्र आता फेन्सिंग व सुरक्षा भिंत बांधल्यामुळे रस्ताच बंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. गेल्या काही वर्षापासून अनेकदा तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधीही कॉलनीला भेट देण्यास आले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यासाठी संघर्ष करणाºया नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. ३८ कुटुंबाच्या १५० च्यावर पात्र मतदारांनी मतदान केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ निवडणुकीवर बहिष्कार नाही तर येथील नागरिकांनी राजकीय नेत्यांना बैठक किंवा रॅली काढू दिली नाही.
नगरसेवकांनी नागरिकांना धरले जबाबदार
याबाबत नगरसेवक भूषण शिंगणे यांना विचारले असता त्यांनी नागरिकांवर रोष व्यक्त केला. कॉलनीचा रस्ता बांधण्यासाठी आवश्यक जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यासाठी निर्धारीत जमीन सरकारची असल्याचे वाटले मात्र ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याने अडचणी येत आहेत. आम्ही समन्वयाने ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र रहिवासी आक्रमक असून तेच सहकार्य करीत नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले.
मिहान प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार मागे
मिहान प्रकल्प पुनर्वसन समिती व प्रकल्पग्रस्तांनी शिवणगाव येथील वित्तुबाबानगर परिसरात बॅनर लावून आपला रोष व्यक्त केला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचीदेखील त्यांनी भूमिका घेतली होती. राजकीय नेते आणि प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकावे अशी नागरिकांची अपेक्षा होती. त्यातच पोलिसांनी येथील कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलली होती. ही बाब शिवसेनेचे गजानन चकोले यांना कळताच त्यांनी भाजपाचे मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना बुधवारी याची कल्पना दिली. बुधवारी रात्रीच संदीप जोशी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांच्या प्रतिनिधींचे बोलणे करून दिले. बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी बहिष्कार मागे घेतला.

Web Title: Mhada Colony Citizens boycott voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.