पंतप्रधान आवास योजनेत म्हाडाची आॅनलाईन लॉटरी दोन आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:23 AM2018-06-07T11:23:56+5:302018-06-07T11:24:05+5:30
नागपूर : पंतप्रधानांनी सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता पंतप्रधान आवास योजना घोषित केली आहे.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधानांनी सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता पंतप्रधान आवास योजना घोषित केली आहे.
महादुला येथे २,०१६ सदनिकांचा प्रकल्प मंजूर
३,१९४ सदनिकांपैकी ३६८ चिखली देवस्थान (शांतिनगर), ७७ वांजरा (कामठी रोड), वडधामना येथे १८९१ (२४३ चे काम पूर्ण व १,६४८ सदनिकांचे बांधकाम सुरू), वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ५३४ सदनिका (२५ चे काम पूर्ण, ५०९ चे काम प्रगतिपथावर), चंद्रपूर येथे ३२४ सदनिकांचे (९६ चे काम पूर्ण, २२८ चे काम प्रगतिपथावर) आहे. ३,१९४ सदनिकांमध्ये अल्प उत्पन्न गटात २,६८९, अत्यल्प उत्पन्न गटात ३१३, मध्यम उत्पन्न गटात १६४ अणि उच्च उत्पन्न गटात २८ सदनिका मंजूर आहेत. याशिवाय महादुला (कोराडी) येथे २,०१६ सदनिकांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या जमिनीवरील आरक्षण उचलण्याचा प्रस्ताव टाऊन प्लॅनिंग पुणे येथे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर नकाशा मंजूर होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.
म्हाडाने दिली जाहिरात
अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेची माहिती देण्यासाठी म्हाडाने दोनदा जाहिरात दिली आहे. म्हाडाचे व खासगी बिल्डर्सचे नकाशे म्हाडा मंजूर करणार आहे. ओसी व बीसीचे अधिकार म्हाडाला दिले आहे. या संदर्भात २३ मे रोजी अध्यादेश निघाला आहे. सर्व प्रकल्प रेराकडे नोंदणीकृत असून रेरा क्रमांक जाहिरात टाकले आहेत. लाभार्थींचे राज्यात कुठेही घर नसावे आणि आधारशी लिंक केले असावे, अशी अट असल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले.
३६४ घरांचे बांधकाम पूर्ण
४म्हाडा नागपूर बोर्डचे मुख्य अधिकारी संजय भीमनवार यांनी सांगितले की, म्हाडाने पूर्ण केलेल्या ३६४ सदनिकांसाठी दोन आठवड्यात आॅनलाईन लॉटरी काढणार आहे. भारतातील व भारताबाहेरील कुणीही नागरिक यात भाग घेऊ शकतो. सर्व सदनिका गुणवत्तेच्या असून बांधकामावर अभियंते आणि आर्किटेक्टचे नियंत्रण आहे.
४म्हाडा अल्प उत्पन्न आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ३,१९४ घरांचे बांधकाम करीत आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मासिक २५ हजार रुपयांपेक्षा कमी आणि अल्प उत्पन्न गटात २५ मासिक ते ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या सदनिकांसाठी राज्य शासन १ लाख आणि केंद्र शासन १.५ लाख रुपये अनुदान देणार आहे. अत्यल्प गटातील सदनिकांसाठी एकूण २.५० रुपये अनुदान तर अल्प गटातील सदानिकांसाठी कर्जावरील व्याजदरात २.५० टक्के सूट मिळणार आहे. राज्यात योजनेसाठी म्हाडाला नोडल एजन्सी नियुक्त केले आहे.
४योजनेंतर्र्गत नागपूर मंडळाच्या कार्यक्षेत्रात नागपूर, कामठी, काटोल, सावनेर, वर्धा, आर्वी, पुलगांव, हिंगणघाट, भंडारा, तुमसर, गोंदिया, चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, वरोरा, बल्लारपूर व गडचिरोली या १७ शहरांमध्ये लागू आहे. त्यामध्ये ३६४ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून वाटपासाठी सज्ज झाले आहे. ३६४ पैकी २४३ घरे नागपुरातील वडधामना, ९६ घरे चंद्रपूर आणि २५ घरे हिंगणघाट येथे पूर्ण झाली आहेत. याशिवाय २६२ घरांचे टेंडर मंजूर झाले असून १३६ घरांचे टेंडर काढले आहे. ब्रह्मपुरी येथे ४५० आणि भंडारा येथील ५५२ सदनिकांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.