‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर : आदित्य अभंग राज्यात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:19 AM2018-06-03T01:19:20+5:302018-06-03T01:19:42+5:30

‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ गुण प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'MHT-CET' results announced: Aditya Abhang's 'Top' | ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर : आदित्य अभंग राज्यात ‘टॉप’

‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर : आदित्य अभंग राज्यात ‘टॉप’

Next
ठळक मुद्देविद्यार्थिनींमध्ये मोना गांधी अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ गुण प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गुणवंत विद्यार्थी हे नेमके कुठल्या जिल्ह्यातील आहेत हे ‘राज्य सीईटी सेल’ने रात्री उशिरापर्यंत जाहीर केले नव्हते. आदित्य अभंग हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधूनदेखील पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘सीईटी सेल’मधून मिळालेल्या माहितीनुसार औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी असलेल्या ‘पीसीबी ग्रुप’मध्ये अभिजित कदम याने १८८ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला आहे. तर मुलींमध्ये जान्हवी मोकाशी (१८३) पहिल्या क्रमांकावर आहे.
१० मे रोजी ‘राज्य सीईटी सेल’तर्फे अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्यात आली होती. राज्यातील ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. विदर्भातील निकालाची आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नाही.

अशी आहे विद्यार्थ्यांची संख्या ?
प्राप्त गुण    पीसीएम        पीसीबी
५० हून कमी ६२,९२२        ५९,५७७
५१-१००        २,११,६२३       ३,२१,९९१
१०१-१२५        १३,३२६        २३,१९१
१२६-१५०        ६,१०८         ९,५६३
१५१-१७५        २,३८२        ३,०३६
१७६-२००       २५७            २७७

Web Title: 'MHT-CET' results announced: Aditya Abhang's 'Top'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.