मिहान घेणार आंतरराष्ट्रीय भरारी

By admin | Published: December 28, 2015 03:17 AM2015-12-28T03:17:37+5:302015-12-28T03:17:37+5:30

वर्षभरापासून विकासाच्या मार्गावर असलेला मिहान प्रकल्प पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन देशविदेशातील नामांकित कंपन्यांना ..

Mihaan to take international hockey | मिहान घेणार आंतरराष्ट्रीय भरारी

मिहान घेणार आंतरराष्ट्रीय भरारी

Next

नागपूर : वर्षभरापासून विकासाच्या मार्गावर असलेला मिहान प्रकल्प पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन देशविदेशातील नामांकित कंपन्यांना उद्योग सुरू करण्यास आमंत्रित करण्याचा निर्णय रविवारी रामगिरी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरीय सल्लागार नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.

मिहानमध्ये उत्पादनावर आधारित उद्योग सुरू करण्याचे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत. मिहानचा आढावा, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या सल्लागार समितीची दुसरी बैठक मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री आणि मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, मिहानचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वेदचे विलास काळे, विजय राऊत, तेजिंदरसिंग रेणू, किशोर वानखेडे, व्हीआयए, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. रणधीर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे हेमंत गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे उपस्थित होते.

Web Title: Mihaan to take international hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.