मिहानचे होणार आंतरराष्ट्रीय मार्केटिंग
By admin | Published: January 19, 2016 03:59 AM2016-01-19T03:59:44+5:302016-01-19T03:59:44+5:30
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मंडळाने मिहानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी एजन्सी
नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मंडळाने मिहानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
याशिवाय शिवणगाव येथे रस्त्यांचे नेटवर्क आणि अन्य संसाधनांसाठी ३३.२० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच रेल्वेची एजन्सी ‘राईट्स’ला मिहानमध्ये मेट्रो रेल्वे व कॉन्कोर डेपोसाठी ६.५ एकर जमीन आणि वैद्यकीय उपकरणांच्या सुट्याभागासाठी सल्लागारासह अन्य काही प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शिवणगावसाठी १५०० कोटींच्या पॅकेज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मिहानसंदर्भातील प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, हे उल्लेखनीय. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)