सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे तपास यंत्रणांच्या रडारवर

By admin | Published: February 27, 2017 11:49 PM2017-02-27T23:49:22+5:302017-02-27T23:49:22+5:30

लष्कराच्या पेपरफूट प्रकरणामुळे राज्यातील ठिकठिकाणचे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि त्यांचे संचालक तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

Military recruitment training centers on the radar of investigating agencies | सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे तपास यंत्रणांच्या रडारवर

सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे तपास यंत्रणांच्या रडारवर

Next
>ऑनलाइन लोकमत/नरेश डोंगरे
नागपूर, दि.27 - लष्कराच्या पेपरफूट प्रकरणामुळे राज्यातील ठिकठिकाणचे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि त्यांचे संचालक तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. अनेक केंद्र संचालकांची चौकशीही सुरू झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे. 
लष्करासह संपूर्ण सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाºया या प्रकरणाचा ठाणे पोलिसांनी भंडाफोड करून महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये सुमारे ४०० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील काहींची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले तरी कारवाईच्या टप्प्यात असलेल्या अनेकांची कसून चौकशी केली जात आहे. देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावू पाहणाºया या प्रकरणात सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे, ठाणे आणि नागपूरसह अनेक ठिकाणच्या सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांची नावे आली आहेत. सूत्रधार संतोष शिंदे ययाने उपरोलिखित शहरांसह ठिकठिकाणच्या प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांशी संपर्क करून त्यांच्याकडील उमेदवारांना (जे सैन्य दलाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते.) लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लेखी परीक्षेत गैरप्रकाराचा अवलंब करण्यास भाग पाडले. एका वरिष्ठ अधिकाºयांच्या माहितीनुसार, शिंदेने ठिकठिकाणच्या सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालकाशी संपर्क करून त्याला त्याच्या संस्थेत (कथित अकादमी) प्रशिक्षण घेणाºया उमेदवाराची रक्कम मोजायची तयारी असेल तर परीक्षेपूर्वीच पेपर मिळवून देऊ, असा निरोप देण्यास सांगितले. शिंदेच्या टोळीत सहभागी होऊन विद्यार्थी (उमेदवार) पोहचविणाºयाला थेट ५० टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. एका उमेदवाराकडून किमान ८० हजार रुपये आणि जास्तीत जास्त चार ते पाच लाख घ्यायचे असे ठरले. अर्थात एका केंद्र संचालकाने १० विद्यार्थी दिले आणि त्यांच्याकडून आठ लाख रुपये मिळाले तर चार लाख केंद्र संचालकाला आणि चार लाख शिंदेला मिळणार असा सौदा होता. त्यामुळे अनेक केंद्रांच्या संचालकांनी शिंंदेच्या टोळीत सहभागी होऊन लष्कराच्या परीक्षेला बसणाºया परीक्षार्थ्यांना गैरप्रकार (भ्रष्टाचार!) करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे छत्रपती अकादमी, ओकरे अकादमी, टँगो चार्ली अकादमीसह ठिकठिकाणचे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि त्यांचे संचालक तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
 हे सर्व २६ फेब्रुवारीला झालेल्या सैन्याच्या लेखी परीक्षेला सुरुंग लावणारे होय. त्यांच्यासोबत आणखी अनेक प्रशिक्षण केंद्रांची लांबलचक यादी तपास यंत्रणांच्या हाती आहे. त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे परीक्षार्थ्यांकडून गैरप्रकार करवून  घेतल्याचे आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाºया लष्कराला भ्रष्टाचाराची उधळी लावण्याचे महापाप केल्याचा संशय आहे. त्यामुळे या सर्वांची गोपनीय मात्र कसून चौकशी केली जात आहे. 
 
कुठे आहे रवींद्रकुमार?
या रॅकेटचा सूत्रधार संतोष शिंदे याच्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे सैन्य दलाच्या परीक्षेचा प्रश्नसंच पाठविणारा रवींद्र कुमार नागपुरातील एका बटालियनमध्ये कार्यरत असल्याचे शिंदेने पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार, येथील आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या शीर्षस्थांसह अनेक वरिष्ठांसोबत पोलिसांनी संपर्क करून रवींद्रकुमारची माहिती मागितली. परीक्षेच्या पेपरसारखी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणा-यापैकी रवींद्रकुमार नामक कर्मचारी, अधिकारी आमच्याकडे नाही, असे संबंधितांनी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे शिंदेने सांगितलेले नाव खरे आहे की खोटे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा शोध घेण्यासोबतच रवींद्रकुमारचे गॉडफादर कोण आहे, त्याचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. लष्कराच्या शीर्षस्थांनीही या धक्कादायक प्रकरणाची दखल घेतली असून, अनेक वरिष्ठ अधिकारी आज ठाणे आणि नागपुरात आल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. स्वत:सोबत त्यांचेही नाव उघड करण्यास संबंधित सूत्रांनी नकार दिला आहे. 

Web Title: Military recruitment training centers on the radar of investigating agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.