सैन्य प्रशिक्षण काळातील 'रगडा'च सैनिकांना घडवितो : कॅ. मधुसूदन वखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:55 PM2019-12-16T23:55:00+5:302019-12-17T00:01:01+5:30

युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.

Military training makes the 'rub' the soldiers: Capt Madhusudan Vakhare | सैन्य प्रशिक्षण काळातील 'रगडा'च सैनिकांना घडवितो : कॅ. मधुसूदन वखरे

सैन्य प्रशिक्षण काळातील 'रगडा'च सैनिकांना घडवितो : कॅ. मधुसूदन वखरे

Next
ठळक मुद्देअ वॉर डायरी : १९७१ चे युद्ध आणि पाकड्यांनी बंगालींवर केलेला अत्याचारउलगडला बांग्लादेश निर्मितीचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.
रणशिंग आणि मनी बी च्या वतीने १९७१च्या युद्धातील विजयाला, बांगलादेश निर्मितीला व ९३ हजार पाकिस्तानि सैनिकांच्या शरणागतीला ४८ वर्ष पूर्ण झाल्याच्या पर्वावर त्या युद्धात आत्ताच्या बांगलादेश सीमेवर तीन पॉईंटवर नेतृत्व करणाऱ्या कॅ. वखरे यांची प्रगट मुलाखत प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर यांनी घेतली. सिव्हिल लाईन्स येथील चिटनविस सेंटर येथे हा कार्यक्रम सोमवारी पार पडला.
११ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या युद्धाच्या काळात मी डायरी लिहिली. कुठून डायरी आली आणि त्यावर युद्ध प्रसंगातील घटना लिहून काढाव्या, असे सुचले हे देवच जाणे. मात्र, त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीच डायरी लिहिली नाही. या डायरीमधील नोंदी युद्धप्रसंगातील दस्ताऐवज झाल्याचे कॅ. वखरे यावेळी म्हणाले. सेनेत अनुशासन, चिकाटी आणि देशनिष्ठा अंगी बाणवली जाते. सैनिक युद्धात कधीच मरत नाही. तो विरगतीला प्राप्त होतो. मृत्यूचे भय जपून मुलांना सेनेत जाण्यापासून परावृत्त करू नका. सेनेत युद्धात विरगतीला प्राप्त होणाऱ्यांपेक्षा देशात दररोज रस्ते अपघातात हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. सैनिकाची नोकरी ही मानाची, प्रत्येक कुटूंबाला अभिमान वाटावी अशी आहे. प्रत्येक घरातून एक तरुण सेनेत असला तर त्या कुटूंबात आपल्या सिमा, देश आणि आपले नागरिक, आपला इतिहास याबद्दल समाजात जाणिव होईल. सैनिकाबद्दल मनात सन्मान वाढेल आणि संपूर्ण समाज अनुशाशीत होईल, असे ते म्हणाले. यावेळी प्रसिध्द वक्ते आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते. निवेदन प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले.

बरं झालं घोडा नव्हता! - अनुराधा वखरे
हे उत्तम घोडेस्वार आहेत. सर्कस मधील सर्व कवायती ते सहज करतात. कुठे फिरायला गेलो आणि घोडा दिसला की लगेच घोड्याची लगाम घ्यायची आणि सुसाट पळायचं, हा त्यांचा नेम. बरं झालं आमच्या लग्नात नवरदेवाला घोडा नव्हता. नाही तर घोड्यावर नवरदेव म्हणून आलेले कॅप्टन स्वत:ला पृथ्वीराज चौहान समजले असते आणि मला संयुक्ता समजून सुसाट पळाले असते, अशी मिस्कीली अनुराधा मधुसूदन वखरे यांनी यावेळी केली. देशभक्ती प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. आई-वडिलांनी मुलांमध्ये देशप्रेम जागृत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

अटलजींचे ते आवाहन मानले गेले असते तर! - दयाशंकर तिवारी
१९०५ मध्ये आपण गुलामीत असतानाही इंग्रजांना बंगालची फाळणी करू दिली नव्हती. त्यासाठी लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल यांनी आंदोलन उभे केले. १९४७मध्ये भारताचे विभाजन झाल्यानंतर, १९७१च्या युद्धामुळे बंगाल प्रांत पुन्हा भारतात विलिन करून लाल-बाल-पाल यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याची मागणी तेव्हा संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, तसे केले गेले नाही. अन्यथा बांग्लादेश कधीच अस्तित्त्वात आला नसता, अशी भावना दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Military training makes the 'rub' the soldiers: Capt Madhusudan Vakhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.