दूध उत्पादकांना धमक्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:14 AM2018-07-17T04:14:58+5:302018-07-17T04:15:06+5:30
विधान परिषदेत सोमवारी शेतकऱ्यांच्या दूध दर आंदोलनाचे पडसाद उमटले.
नागपूर : विधान परिषदेत सोमवारी शेतकऱ्यांच्या दूध दर आंदोलनाचे पडसाद उमटले. विरोधकांनी दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदानाची घोषणा केली पण दूध उत्पादकांच्या पदरात काहीच पडले नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू असल्याने त्यांना कृषी राज्यमंत्र्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी सोमवारी विधान परिषदेत केला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी दूध उत्पादकांच्या आंदोलनावर नियम २८९ अन्वये चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत दूध दरावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा
प्रयत्न केला. दूध उत्पादकांनी मुंबईचा दूध पुरवठा बंद केला असल्याने
दूध उत्पादकांच्या आंदोलनावर
चर्चा करण्याची मागणी तटकरे
यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भावना सरकापर्यंत पोहचल्याचे सांगितले. मात्र विरोधकांचे
समाधान झाले नाही. सभागृहातील गोंधळामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.