शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश व्हावा : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:49 PM2018-11-24T21:49:55+5:302018-11-24T21:50:55+5:30

मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात अडीच लाख लिटर दुधाची खरेदी सुरू आहे. विदर्भात जिल्हा आणि तालुकास्तरावर मदर डेअरीचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, दुधाचा वापर वाढविण्यासाठी लग्न, वाढदिवस आणि शालेय पोषण आहारात दूध वितरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Milk should be included in school nutrition diet: Nitin Gadkari | शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश व्हावा : नितीन गडकरी

शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश व्हावा : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय दुग्धविकास परिषदेचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात अडीच लाख लिटर दुधाची खरेदी सुरू आहे. विदर्भात जिल्हा आणि तालुकास्तरावर मदर डेअरीचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, दुधाचा वापर वाढविण्यासाठी लग्न, वाढदिवस आणि शालेय पोषण आहारात दूध वितरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनांतर्गत शनिवारी आयोजित दुग्धविकास परिषद व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत. परिषदेला पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर, उत्तर प्रदेशचे कृषी व कृषी शिक्षण मंत्री सूर्य प्रताप शाही, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुप कुमार, महापौर नंदा जिचकार, माफसूचे अधिष्ठाता डॉ. एन. एम. झाडे, रवींद्र ठाकरे, अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, मदर डेअरीने नागपुरात दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारून जिल्हा व तालुकास्तरावर प्रचार-प्रसार केल्यास दरमहा २० कोटींची उलाढाल होईल. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असून, शेतकऱ्यांनीच मदर डेअरीचे दूध खरेदी करण्याचे आवाहन ग्राहकांना करणे गरजेचे आहे. सेंद्रिय खताअभावी शेतीचे उत्पादन घटले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत तयार करण्यासाठी पाऊल उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली. राज्याचे दूध उत्पादन पाच लाख लिटरवर पोहोचले असून, अधिक दूध देणारे पशुधन वाढविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप रथ यांनी भारत सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. सी. डी. मायी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. परिषदेला नागपूर जिल्ह्यासह विदर्भातून आलेले शेतकरी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दूध वाटपावर लवकरच निर्णय
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दूध देण्याबाबत तीन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दुग्ध व मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी दिले. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मदर डेअरीने विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात दूध घ्यावे आम्ही ५० टक्के सबसिडी देऊ, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Milk should be included in school nutrition diet: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.