कोट्यवधींच्या जमिनी बेवारस
By admin | Published: July 18, 2015 03:13 AM2015-07-18T03:13:45+5:302015-07-18T03:13:45+5:30
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी जि.प.कडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामविकास विभागाने तीन वर्षापूर्वी घेतला होता.
गणेश हूड नागपूर
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी जि.प.कडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामविकास विभागाने तीन वर्षापूर्वी घेतला होता. परंतु अद्यापही १३ पंचायत समित्यातील शेकडो कोटीची १२१३ हेक्टर जमीन बेवारस वा अतिक्रमण असलेल्या अवस्थेत आहे.
जुन्या जनपदकालीन जमिनी १९६२ साली निर्मितीसोबतच जि.प.च्या ताब्यात येणे अपेक्षित होते. परंतु गेल्या ५३ वर्षाच्या कालावधीत अनेक ठिकाणच्या जमिनीच्या सातबारावर नाव न चढवल्याने या जमिनींचा कायदेशीर मालकी हक्क जि.प.कडे आलेला नाही.
जिल्ह्यातील ३० ठिकाणच्या जागा अद्याही बेवारस वा अतिक्रमण असलेल्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील १११ जमिनी ताब्यात असणे अपेक्षित होते. परंतु यातील ८१ जागा कब्जात आहेत. ३० जागा अद्याप जि.प.च्या नावावर चढलेल्या नाही. २९ जानेवारी २००४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद, पंचायत समित्ी व ग्रामपंचायत यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे अधिलेख तयार करणे व अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. परंतु जमिनीचे फेरफार करताना तांत्रिक अडचणी पुढे विभाग हतबल असल्याचे चित्र आहे. जि.प.च्या मालकीच्या बडकस चौक, झिंगाबाई टाकळी , वर्धा मार्गावरील साईमंदिर लागत, भामटी परसोडी, सुभाषनगर, हिंगणा रोड, पटवर्धन हायस्कूल आदी जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. सोन्याचा भाव असलेल्या यातील काही जागावर अतिक्र मण झालेले आहे.
परसोडी येथील १३ एक रपैकी काही जागेवर अतिक्र मण झाले आहे. हिंगणा मार्ग व झिंगाबाई टाकळी येथील जागेच्या काही भागात अतिक्र मण आहे.