जिल्ह्यातील लाखो मोबाईल नंबर अपडेटच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:52+5:302021-04-28T04:09:52+5:30
नागपूर : जिल्ह्यातील लाखो वीज ग्राहकांनी अद्यापही आपला मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही. कंपनीचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी ...
नागपूर : जिल्ह्यातील लाखो वीज ग्राहकांनी अद्यापही आपला मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही. कंपनीचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी यासाठी ग्राहकांना आवाहन केले असून, वीज कंपनीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
कंपनीच्या नागपूर विभागात एकूण १६ लाख ३७ हजार ६२३ वीज ग्राहक आहेत. यातील १४ लाख ९२ हजार ८५५ वीज ग्राहकांचे मोबाईल क्रमांक कंपनीमध्ये नोंदणी झाले आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख ८३ हजार ११२ वीज ग्राहकांपैकी ३ लाख ४५ हजार २९ ग्राहकांचे नंबर पंजीकृत आहेत. शहरातील ९ लाख १८ हजार ८५५ ग्राहकांपैकी ८ लाख ३८ हजार ८७१ ग्राहकांनी पंजीकरण केले आहे. या ग्राहकांच्या मोबाईलवर कंपनीच्या सर्व अपडेट्सची माहिती मिळत आहे. दुरूस्ती, तांत्रिक अडचणी, वीज पुरवठ्यातील कमतरता यासंदर्भात माहिती ग्राहकांना दिली जाते. यासोबतच बिलाची माहिती, मीटर रीडिंग पाठविण्याची सूचना, वापरण्यात आलेले युनिट यासंदर्भातही माहिती दिली जाते. महावितरणच्या मोबाईल क्रमांक ९९३०३९९३०३ वर एसएमएस पाठवून ग्राहकाला पंजीकरण करता येऊ शकते.