लाखो रुपये खर्चून लावलेले एस्केलेटर बंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:03+5:302021-09-13T04:09:03+5:30
नागपूर : लाखो रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकावर एस्केलेटर लावले; परंतु यातील बहुतांश एस्केलेटर नेहमीच बंद राहत ...
नागपूर : लाखो रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकावर एस्केलेटर लावले; परंतु यातील बहुतांश एस्केलेटर नेहमीच बंद राहत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णांची गैरसोय होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर एकूण पाच एस्केलेटर आहेत. यातील एक एस्केलेटर आरपीएफ ठाण्याच्या बाजूला आहे; परंतु येथून प्रवाशांची ये-जा बंद करण्यात आली आहे. या एस्केलेटरवर कचरा साचला असून पायऱ्यावर जाळ्या लागल्याची स्थिती आहे. केवळ २/३ क्रमांकावरील एस्केलेटर सुरू आहे. ४/५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील आणि पूर्वेकडील दोन्ही एस्केलेटर बंद आहेत. हे एस्केलेटर नेहमीच बंद राहत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वी इलेक्ट्रिक विभागातील एक महिला या एस्केलेटरच्या देखभालीचे काम पाहत होती. तिचा मोबाइल क्रमांकही एस्केलेटरच्या बाजूला लिहिलेला असायचा; परंतु तिच्या ठिकाणी दुसऱ्या महिलेला हे काम देण्यात आल्यापासून बहुतांश एस्केलेटर बंद राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी बंद असलेले एस्केलेटर सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
...................