उमरेड परिसरातील खाणपट्ट्यांची चौकशी

By Admin | Published: December 25, 2014 12:29 AM2014-12-25T00:29:51+5:302014-12-25T00:29:51+5:30

उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये झालेल्या उत्खननाची विभागीय आयुक्त व खनिकर्म अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याचे

Mine reports in Umred area | उमरेड परिसरातील खाणपट्ट्यांची चौकशी

उमरेड परिसरातील खाणपट्ट्यांची चौकशी

googlenewsNext

महसूलमंत्र्यांची घोषणा : हिंगण्यातही मोक्का तपासणी
नागपूर : उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये झालेल्या उत्खननाची विभागीय आयुक्त व खनिकर्म अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याचे आढळले तर संबंधित खाणपट्ट्याची परवानगी रद्द करून व दंडही आकारला जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत यासंबंधीची घोषणा केली.
दगडखाणीत अवैध उत्खनन करून लाखोंची माया जमविणाऱ्या खाण लॉबीला हा मोठा दणका मानला जात आहे.
आ. सुधीर पारवे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करीत त्यांच्या मतदारसंघातील उमरेड व भिवापूर तालुक्यात खाणपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उत्खनन होत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. पारवे म्हणाले, उमरेड व भिवापूर तालुक्यात मौजा पाचगाव, सुरगाव, चिमणाझरी, मटकाझरी, पारडगाव, सायकी, मोहपा, धुरखेडा, कुंभारी, कवडसी, बरड, चारगाव (गोटाळी), मांगरुळ, गरडापार येथे मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून, काहींनी परवानगी मिळालेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेवर उत्खनन केले आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. या खाणींची उच्चस्तरीय चौकशी करून पट्ट्यांची मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर महसूलमंत्री खडसे यांनी चौकशीचे आदेश दिले.
आ. समीर मेघे यांनी हिंगण्यातील राजीवनगर परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार करीत चौकशीची मागणी केली. यावर संबंधित जागेची मोक्का तपासणी करण्याचे आदेश खडसे यांनी दिले. रॉयल्टीपासून मिळणारा निधी संबंधित जिल्ह्यातच खर्च व्हावा, अशी मागणी आ. आशिष देशमुख यांनी केली असता, सरकार रॉयल्टीचा काही भाग संबंधित जिल्ह्यांनाच देत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mine reports in Umred area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.