नागपुरात मेट्रोच्या वेळानुसार धावणार मिनी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 09:10 PM2019-06-13T21:10:41+5:302019-06-13T21:11:42+5:30

प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून कमी अंतरासाठी छोट्या वाहनांची सुविधा असेल. मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आपली बसच्या ४५ मिनी बसेस धावतील.

Mini bus to run at Nagpur Metro time | नागपुरात मेट्रोच्या वेळानुसार धावणार मिनी बस

नागपुरात मेट्रोच्या वेळानुसार धावणार मिनी बस

googlenewsNext
ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी फिडर बस सेवा : आपली बसच्या उत्पन्नाला हातभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून कमी अंतरासाठी छोट्या वाहनांची सुविधा असेल. मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आपली बसच्या ४५ मिनी बसेस धावतील.
महापालिकेचा परिवहन विभाग त्यानुसार नियोजन करणार आहे. पुढील आठवड्यात या बसेस सुरू होणार आहे.
रांची, जयपूर येथे मेट्रो सुरू झाली. शहरातून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना येण्यासाठी सुलभ व्यवस्था न केल्यामुळे या मेट्रोना अपेक्षित प्रवासी मिळाले नाहीत. त्यामुळे आता केंद्र सरकारने देशात जिथे मेट्रो प्रकल्प सुरू आहेत, त्या सर्व ठिकाणी प्रवाशांना थेट स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी म्हणून फिडर बस व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपुरातही व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका मिनी बसेस चालविणार आहे.
फिडर बस सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत येता येईल किंवा मेट्रोमधून बाहेर पडल्यावर शहरात इच्छित स्थळी जाता येईल. यामुळे आपली बसच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जुलैत धावणार इलेक्ट्रीक बस
आपली बसच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रीक बसेस सामील होत आहे. जुलै महिन्यात या बसेस शहरात धावायला सुरुवात होईल. त्यापूर्वी चार्जिग स्टेशन सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी हरिहर मंदिर जवळ जागा निश्चित केली असून जुलै महिन्यात हे स्टेशन कार्यान्वित होईल. स्टेशन कार्यान्वित होताच इलेक्ट्रीक बससेवा सुरू होईल.
सीएनजीवर धावतील शहर बसेस
इंधन बचत व पर्यावरण पूरक वाहतुकीसाठी शहरात धावणाºया सर्व बसेस टप्प्याटप्प्याने सीएनजीवर धावतील. यामुळे परिवहन विभागाची वर्षाला ६० कोटींची बचत होईल. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीमुळे प्रदूषणालाही आळा बसेल असा विश्वात परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मिनी बस याच महिन्यात धावेल
महापालिका शहरातील नागरिक व मेट्रो प्रवाशांची सुविधा व्हावी. यासाठी फिडर बससेवा लवकर सुरू करीत आहे. ४५ मिनी बसेस याच महिन्यात धावतील. जुलै महिन्यात पाच इलेक्ट्रीक बसेस धावतील. शहर बसेस सीएनजीवर चालविण्यासाठी नियोजन केले आहे. यामुळे शहरातील प्रदूणाला आळा बसेल. सोबतच इंधन बचतीमुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल.
बंटी कुकडे परिवहन सभापती

Web Title: Mini bus to run at Nagpur Metro time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.