नागपुरात आपली बसच्या ताफ्यात मिनीबसचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 08:50 PM2019-06-25T20:50:36+5:302019-06-25T20:51:54+5:30

नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर मान्यवरांनी पारडी आणि बर्डी या मार्गावर धावणाऱ्या मिनीबसमधून प्रवास केला.

Minibus includes in Apali bus fleets in Nagpur | नागपुरात आपली बसच्या ताफ्यात मिनीबसचा समावेश 

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात मिनीबसचा समावेश 

googlenewsNext
ठळक मुद्देकृष्णा खोपडे यांच्या हस्ते सहा बसचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर मान्यवरांनी पारडी आणि बर्डी या मार्गावर धावणाऱ्या मिनीबसमधून प्रवास केला.
सतरंजीपुरा चौक येथे आयोजित कार्यक्रमाला स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, सदस्य नितीन साठवणे, संजय महाजन, झोन सभापती अभिरुची राजगिरे, समिता चकोले, नगरसेविका मनीषा कोठे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपुरडे, बस आॅपरेटर ट्रॅव्हल टाईमचे सदानंद काळकर, आर.के.सिटीचे नीलमणी गुप्ता, हंसा ट्रॅव्हल्सचे जे.पी. पारेख, डीम्सचे टीम लीडर सूर्यकांत अंबाडेकर आदी उपस्थित होते.
शहरातील खासगी वाहतूक कमी व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम बनविण्याचा प्रयत्न महापालिका आणि स्थानिक नेतृत्वाच्या वतीने होत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच अनेक वस्त्यांमधील लहान रस्त्यांवर असलेल्या लोकांनाही आपली बसची सेवा मिळावी या हेतूने मिनीबस आता परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अशा आणखी बसेस आणण्याचा मानस असल्याचे कृष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
बंटी कुकडे म्हणाले, परिवहन सेवा पर्यावरणपूरक करण्याचा विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने परिवहन समितीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थसंकल्पातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘चलो अ‍ॅप’च्या माध्यमातून परिवहन सेवा अधिकाधिक लोकाभिमुख बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांसाठी लवकरच तेजस्विनी बसेस धावणार आहेत. लोकांनी या सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Minibus includes in Apali bus fleets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.