मंत्रिमहोदय, वीज स्वस्त नाही, महाग झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:18+5:302020-11-28T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मंत्रालयाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयाचा वार्षिक अहवाल दिला. त्यात त्यांनी दावा केला, की राज्यात घरगुती वीज ५ टक्के कमी झाली आहे. परंतु मंत्रिमहोदयांचा हा दावा केवळ आकड्यांचा फेरफार आहे. वास्तविक राज्याच्या जनतेला मिळत असलेले वीज बिल त्यांचा दावा फोल ठरविणारा आहे. हे बिल गेल्या वर्षीच्या तुलनेत बरेच जास्त आहे.
राज्यात १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या विजेच्या नवीन दरानुसार सरासरी वीज दर ७ टक्के कमी झाले आहे. घरगुती वीजसुद्धा ५ टक्के कमी झाले आहे. असा दावा राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सामान्य नागरिकांच्या बिलाचे विश्लेषण केले. फिक्सड् चार्जमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे सर्वच श्रेणीतील एकूण बिल वाढले आहे. नवीन दराच्या घोषणेच्या वेळी दावा केला होता की, ० ते १०० युनिटपर्यंतचे दर कमी करण्यात आले आहे.
दरांच्या आकड्यावर नजर टाकल्यास ते बरोबर दिसते. पण जसे यात फिक्स चार्ज जोडल्यास ४.३३ रुपये प्रति युनिट दर वाढून ४.९१ रुपये झाले आहे. म्हणजेच १३.३९ टक्के वीज दरात वाढ झाली आहे. ०१ ते ३०० युनिट दर ८.८८ रुपये प्रति युनिट ठेवण्यात आले आहे. श्रेणी बदलताच ४.९१ प्रति युनिट दर वाढून ८.८८ रुपये प्रति युनिटवर पोहचतो. श्रेणीच्या दरामध्ये असलेल्या असमानतेमुळे वीज बिल बरेच वाढल्याचे दिसते आहे. या दोन श्रेणीत बहुतांश ग्राहक येतात. त्याचा सरळ परिणाम त्यांच्या खिशावर पडतो आहे.
फिक्स चार्ज ९० रुपये वाढवून, प्रत्येक श्रेणीसाठी १०० रुपये केले आहे. कागदावर एकूण दर वृद्धी कमी करण्यासाठी जास्त श्रेणीतील विजेच्या दरात फार वाढ केली नाही. जसे ३०१ ते ५०० युनिटसाठी ५.२८ टक्के व ५०१ ते १००० साठी २.९१ टक्के वृद्धी केली आहे. १००१ पेक्षा अधिक युनिटचा उपयोग करणाऱ्यांसाठी दर ४.५० टक्के कमी केले आहे. या श्रेणीत फार कमी व फक्त श्रीमंत ग्राहक येतात. दरांची वाढ लपविण्यासाठी फक्त आकड्यांची फेरफार केल्याचे दिसून आले.
................
चौकट...
श्रेणी २०१९ २०२०
-युनिट - फिक्स्ड चार्ज - प्रति युनिट दर - फिक्स्ड चार्ज - प्रति युनिट दर - वाढीची टक्केवारी
०-१०० ९० ४.३३ १०० ४.९१ १३.३९
१०१-३०० ९० ८.२३ १०० ८.८८ ७.९०
३०१-५०० ९० ११.१८ १०० ११.७७ ५.२८
५०१- १००० ९० १२.७८ १०० १३.१६ २.९७
१००० पेक्षा जास्त ९० १३.७८ १०० १३.१६ -४.५०
नोट : प्रति युनिट दर व फिक्स्ड चार्ज रुपयांत वाढले आहे.