मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प विचाराधीन असल्याची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:30 PM2017-12-12T18:30:03+5:302017-12-12T18:30:50+5:30

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Minister of Transport Minister Divakar Raote said that Mumbai-Nagpur bullet train project is under consideration | मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प विचाराधीन असल्याची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प विचाराधीन असल्याची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

Next
ठळक मुद्देकेंद्राकडून अद्याप प्रस्तावाबाबत खातरजमा नाही

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
रेल्वे मंत्रालयाने स्पॅनिश कंपनीची मुंबई-नागपूर जलदगती रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र राज्य सरकारला केंद्र शासनाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Minister of Transport Minister Divakar Raote said that Mumbai-Nagpur bullet train project is under consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.