अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: September 5, 2015 03:09 AM2015-09-05T03:09:45+5:302015-09-05T03:09:45+5:30

स्वत:च्याच कुंटणखान्यावर बोगस पोलिसांची धाड घालणाऱ्या टोळीतील तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता,...

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Next

आठ महिन्यानंतर पाप उजेडात : बोगस पोलीस मुख्य आरोपी
नागपूर : स्वत:च्याच कुंटणखान्यावर बोगस पोलिसांची धाड घालणाऱ्या टोळीतील तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्कार केला होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या प्रकरणात ‘त्या‘ टोळीसोबतच एका मोक्काच्या फरार आरोपीला अटक केली आहे.
महिनाभरापूर्वी गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने एमआयडीसीत एक टोळी पकडली होती. ओळखीच्या व्यक्तींना तरुण मुली, महिला उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवायचे. त्यांना आपल्या कुंटणखान्यावर बोलवायचे. तेथे महिला किंवा मुलीसोबत विवस्त्र होताच पोलिसांच्या वेशातील या टोळीचे सदस्य धाड घालायचे. त्यानंतर ‘ती’ महिला किंवा मुलगी बलात्काराचा आरोप लावायची. पोलीस कारवाईचा आणि बदनामीचा धाक दाखवून ‘त्या’ व्यक्तीकडून लाखो रुपये उकळले जायचे. आरोपी चंद्रप्रकाश वारवटकर आणि अल्का ढोके हे या टोळीचे प्रमुख होते. ते अनेक महिला मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित करीत होते. जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या जाळ्यात एक १५ वर्षीय मुलगी अडकली. आरोपी चंद्रप्रकाश वारवटकर आणि अल्का ढोके या दोघांनी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिला असता आरोपी वारवटकर, विशाल ऊर्फ दत्तु अंबादास दाभने आणि दिनेश गायकी या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. चौकशीत ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपी विशाल दाभने (रा. न्यू कैलास नगर, अजनी) तसेच त्याची साथीदार मेरी ऊर्फ सोनु मार्टीन पाल (वय १९, रा. पद्मावती नगर, रुद्र बीअर बार जवळ) या दोघांना अटक केली. (प्रतिनिधी)
मोक्कात २६ वर्षांची शिक्षा ११ महिन्यांपासून होता फरार
आरोपी विशाल दाभने याला मोक्का कायद्याखाली २६ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यातील १३ वर्षांची शिक्षा त्याने भोगली. २० आॅक्टोबर २०१४ ला तो २ महिन्यांच्या संचित रजेवर आला. त्यानंतर तो कारागृहात परत न जाता. फरार झाला. ११ महिन्यांपासून त्याला पोलीस शोधत होते. तो बिनधास्त गुन्हे करीत फिरत होता. अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक सुरक्षा विभागाचे पोनि बी.एम. पोवार, एपीआय वाय.एस. चौधरी, पीएसआय कैलास इंगोले, हवलार प्रकाश सिडाम, मनोज चव्हाण, गोपाल वैद्य, संजय पांडे यांनी भांडे प्लॉट परिसरात त्याच्या मुसक्या बांधल्या.

Web Title: Minor girl gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.