अल्पवयीन मुलीस पळविले, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:01+5:302021-03-15T04:09:01+5:30
पारशिवनी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तिला पळवून नेले. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथे ...
पारशिवनी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तिला पळवून नेले. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथे शनिवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे.
गाेलू ऊर्फ प्रशांत राजकुमार लाेहकरे (वय २७, रा. करंभाड, ता. पारशिवनी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय झाेपून असताना, मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत आराेपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि कलम ३६३, अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पारशिवनी पाेलीस करीत आहेत.