अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:17+5:302021-08-22T04:12:17+5:30
देवलापार : अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन आराेपीने तिचा विनयभंग केला. दरम्यान, आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. ...
देवलापार : अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन आराेपीने तिचा विनयभंग केला. दरम्यान, आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी शिवारात शुक्रवारी (दि.२०) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
पुरुषाेत्तम बाबूलाल काेकाेडे (३५, रा. जुनेवाणी, ता. रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने पीडित १४ वर्षीय मुलीला आधारकार्ड काढण्याकरिता नेले हाेते. परत येताना त्याने स्वत:च्या शेतात नेऊन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न हाेईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ), सहकलम ८, १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पाेलीस निरीक्षक भुते करीत आहेत.