अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:20 PM2018-02-06T23:20:28+5:302018-02-06T23:21:57+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका येथील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका येथील आहे.
आशिष मकरंद पगारे (३३) असे आरोपीचे नाव आहे. त्याला भादंविच्या कलम ३७६(२)(एफ)(आय)(एन) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ५०६ अंतर्गत एक वर्षांचा कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घटनेच्या वेळी पीडित मुलगी सात वर्षे वयाची होती. त्या मुलीवर आरोपी ठार मारण्याची भीती दाखवून अत्याचार करीत होता. अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीने १९ मार्च २०१५ रोजी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील राऊत यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात शासनातर्फे अॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.