नागपुरात झोपेच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:13 PM2019-09-11T22:13:14+5:302019-09-11T22:15:06+5:30

एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे.

Minor girl raped by giving sleeping pills in Nagpur | नागपुरात झोपेच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपुरात झोपेच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next
ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकाचे कृत्य : मुलीच्या आईने केली आरोपीला मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या घटनेचा एका स्वयंसेवी संस्थेने आकस्मिक केलेल्या चौकशीत खुलासा झाला आहे. नंदनवन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आणि अल्पवयीन मुलीच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वाठोडाच्या स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवासी अशोक जायसवाल (५०) आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.
जायसवाल अनेक दिवसांपासून शहरात सक्रिय आहे. त्याची बांधकाम व्यवसायासह शाळाही आहे. काही काळापूर्वी तो समाजाचा अध्यक्षही होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मूळची सिवनीची रहिवासी आहे. तिचे वडील गावातच राहतात. ती आई आणि १५ वर्षाच्या बहिणीसोबत जायसवालच्या नंदनवन ठाण्यांतर्गत असलेल्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहते. तिची आई जायसवालच्या शेतात मजुरी करते. दोन्ही मुलीही तिच्यासोबत काम करतात. जून महिन्यात पीडित मुलीच्या १५ वर्षाच्या लहान बहिणीवर भंडाऱ्याच्या एका युवकाने अपहरण करून अत्याचार केला होता. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिला भंडाऱ्यावरून आणल्यानंतर चौकशीत अत्याचाराचा खुलासा झाला होता. त्याआधारे पोलिसांनी अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्यापही मिळालेला नाही. अपहरण आणि अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी घरी आले होते. चौकशीदरम्यान पोलिसांना जायसवालच्या शोषणाबाबत माहिती दिली. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचार आणि तिच्या लहान बहिणीशी जायसवालने छेडखानी केल्याचे सांगितले. तिचे म्हणणे ऐकून स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी अवाक् झाले. त्यांनी नंदनवन पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ महिला उपनिरीक्षक स्नेहलता जायेभाये यांना प्रकरणाचा तपास सोपविला. पीडितेने चौकशीत घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनुसार जायसवाल त्यांना तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याने पीडितेला तिच्या आईच्या सहकार्याने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. जायसवालच्या कृत्याची माहिती झाल्यानंतरही तिच्या आईने त्याला विरोध केला नाही.
उलट ती मुलीला जायसवालसोबत जाण्यास सांगत होती. जायसवाल तिला एकदा हैदराबादला घेऊन गेला होता. तेथेही त्याने तिला झोपेची गोळी देऊन अत्याचार केला. याशिवाय इतर एका ठिकाणी नेऊनही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या लहान बहिणीलाही कार्यालयात बोलावून छेडखानी केली. जायसवाल आणि पीडितेच्या आईने याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या बयानाच्या आधारे पोलिसांनी अत्याचार, छेडखानी, धमकी देणे आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्वरित जायसवालचे घर गाठले. परंतु तो फरार झाला होता.
आईची माहिती देण्यास टाळाटाळ
पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईची चौकशी केली असता, ती घटनेचा इन्कार करीत आहे. तिने मुलीला २०१६ मध्ये हैदराबादला पाठविले होते. त्याबाबतही ती समाधानकारक उत्तर देत नाही. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिसही अल्पवयीन मुलीच्या चौकशीत संयम ठेवत आहे. जून महिन्यात अपहरण आणि अत्याचार प्रकरणात पोलिसांनी लहान बहिणीची चौकशी केली होती. तिला आईसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तिने जायसवालच्या कृत्याची माहिती दिली नव्हती. आईच्या उपस्थितीत चौकशी केल्यामुळे तिने खरी हकीकत सांगितली नसल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीची आई अनेक दिवसांपासून जायसवालच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नंदनवनचे ठाणेदार यशवंत चव्हाण यांनी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत असून, जायसवालची माहिती मिळाल्यानंतरच तपास होऊ शकणार असल्याचे सांगितले.

Web Title: Minor girl raped by giving sleeping pills in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.