नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:10 IST2018-04-22T00:10:25+5:302018-04-22T00:10:34+5:30

गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.

Minor girl raped in Nagpur |  नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्या घराशेजारी आरोपी खोब्रागडे भाड्याने राहत होता. तो खासगी वाहनचालक आहे. मुलीची आई वेगळी राहते तर वडिलांना दारूचे व्यसन आहे. मुलीची आर्थिक आणि कौटुंबिक अवस्था ध्यानात घेऊन त्याने तिची दोन वर्षांपूर्वी छोटी मोठी मदत करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. प्रेमाचे नाटक करीत तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि दोन वर्षांत त्याने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध जोडले. अलीकडे तो टाळू लागल्याने तिला संशय आला. त्यामुळे तिने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला. त्यावरून खोब्रागडेने तिच्यासोबत वाद घातला. तो लग्न करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे तिने शुक्रवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. खोब्रागडे फरार असून, सहायक पोलीस निरीक्षक गिरी त्याचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Minor girl raped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.