अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:21 PM2019-01-23T23:21:07+5:302019-01-23T23:22:43+5:30
येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
काही महिन्यापूर्वी गोकुल खदान येथे तट्ट्याच्या शौचालयात वेकोलि महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतरची ही घटनासुद्धा शौचालयातीलच असल्याने या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सतीश ऊर्फ सदाशिव शाहारे, बंडू जंजाळ, अमोल लोही रा. मंगळवारी पेठ, अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी ही शाळालगत आपल्या मैत्रिणींसह खेळत होती. अशातच सतीश ऊर्फ सदाशिव शाहारे याने पाच वर्षीय मुलीस आमिष दाखवीत शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेच्या आईने दिली आहे. आरोपी सतीश शाहारे हा आपल्या अन्य दोन मित्रांसोबत फिरत होता, असेही तक्रारीत नमूद आहे. उमरेड पोलीस ठाण्यात ३५४ (अ), सहकलम ८ पोक्सो २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील लांघी करीत आहेत.