नागपुरात  अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:40 PM2018-03-16T21:40:03+5:302018-03-16T21:40:14+5:30

लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी मौन पाळले. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे.

Minor girl student raped in Nagpur |  नागपुरात  अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

 नागपुरात  अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाला दिला जन्म : पोलिसांनी दाखल केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी मौन पाळले. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास कोतवाली पोलिसांकडे सोपविला आहे. शुभम कृष्णाजी सोनुले (२३) असे आरोपीचे नाव आहे.
शुभम हा कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत राहतो. पीडित मुलगी सध्या १८ वर्षाची आहे. ती शुभमच्या घरासमोर राहत होती. अत्याचाराची घटना जुलै २०१७ च्या पूर्वीची आहे. पोलीस सूत्रानुसार शुभमने अल्पवयीन विद्यार्थिनीस लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी तिच्यावर अत्याचार केला. मुलीने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. जुलै २०१७ मध्ये ती नाशिकला शिकण्यासाठी गेली. तिथे गेल्यावर काही दिवसानंतर ती गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मुंबईत राहणाऱ्या तिच्या आईच्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. तिने मुलीच्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात केवळ आई आहे. सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे तिच्या आईने ही गोष्ट लपवून ठेवली. परंतु शिकत असलेली मुलगी लग्न न करताच दिवस गेल्याची गोष्ट जास्त दिवस लपून राहू शकली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार पोलिसांकडे गेला. मुंबईतील भोईवाडा ठाण्यात बयाण नोंदवण्यात आले. तेव्हा दोन्ही बाजूंकडून तक्रार नोंदवण्याबाबत नकार देण्यात आला. त्यामुळे पोलिसांनीही कुठलेही पाऊल उचलले नाही.
दरम्यान २७ जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. यानंतर सामाजिक संस्था आणि बाल संरक्षण समितीला या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी पीडित मुलगी आणि आईची भेट घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनीही गुन्हा दाखल करून प्रकरण कोतवाली पोलिसांकडे तपास स्थानांतरित केला. या प्रकरणाचा तपास हवालदार दीपक लांजेवार करीत आहेत.
मुलीसह मुलाचीही जबाबदारी
या घटनेमुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. आई खासगी काम करून घर चालवते. मुलीला नोकरी लागली तर दिवस फिरतील म्हणून तिने मुलीला व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी नाशिकला शिकण्यासाठी पाठवले होते. आता आईवर मुलगी व तिच्या मुलाचीही जबाबदारी आली आहे.

Web Title: Minor girl student raped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.