साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर केला अत्याचार; नागरिकांनी धरून बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 08:15 AM2021-09-03T08:15:00+5:302021-09-03T08:15:02+5:30
Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी आरोपी नरेश मंडलवार (४२) याला बेदम मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी आरोपी नरेश मंडलवार (४२) याला बेदम मारहाण केली. (Minor girl tortured ; The citizens grabbed him)
शेजारी असल्यामुळे पीडित बालिका नरेशच्या घरी ये-जा करीत होती. २९ ऑगस्टला दुपारी पत्नी आणि मुलगा बाहेर गेलेले असताना बालिका नरेशच्या घरी आली. नरेश तिच्याशी जबरदस्ती करीत होता. दरम्यान मुलगी दिसत नसल्यामुळे तिची आई नरेशच्या घरी पोहोचली. तीने नरेशचे कृत्य पाहून त्याला फटकारले आणि मुलीला घरी आणले.
तिने सासू आणि पतीला याची माहिती दिली. ३० ऑगस्टला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नरेशला बेदम मारहाण करून हुडकेश्वर पोलिसांकडे सोपविले. पोलिसांनी बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.