नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:50 AM2018-11-06T11:50:21+5:302018-11-06T11:53:21+5:30

वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती.

Minor girl tortured by father in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून सुरू होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती.
आई वडील आजी दोन भावंडासमवेत शहरातील एका वस्तीत राहते. ४ सप्टेंबर २०१८ रोजी पीडित मुलीचा मोठा भाऊ आपल्या आईसोबत बाहेरगावी गेला होता, बाकी परिवार काटोल येथेच होता त्यादिवशी आपल्या दैनंदिनीप्रमाणे पीडित मुलगी शिक्षणासाठी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालयात गेली. मोठा भाऊ व चुलतभाऊ घरी नसल्याने वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार वडिलांनी तिला घरी आणून सोडले त्यानंतर ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली त्यावेळी वडिलांच्या आत दडलेल्या सैतानाने डोके वर काढण्यास सुरु वात केली. तो पीडितेशी लगट करू लागला त्यात वडिलांचे वात्सल्य दिसून आले नाही पण वासनात्मक दृष्टी दिसून आली होती.
रात्री आजी चुलतभाऊ व सख्खा लहान भाऊ हे तिघेजण आजीच्या खोलीत झोपले तर पीडित मुलगी आपल्या चुलतबहिणीसोबत बाहेरच्या खोलीत खाली अंथरु णावर झोपले. त्याच खोलीत पलंगावर वडीलसुद्धा झोपले. त्यानंतर वडिलांनी पीडितेच्या चुलतबहिणीला उठवून तिला पलंगावर झोपविले तो पीडित मुलीजवळ गेला व तिचेवर तोंड दाबून जबरी अत्याचार केला. हे किळसवाणे दृश्य चुलतबहिणीने पाहिले व चुपचाप पांघरुण घेऊन पडून राहिली. सकाळी रात्री घडलेला प्रकार आपल्या भावाला म्हणजे पीडितेच्या चुलतभावाला सांगितला. पीडितेने आईला व भावाला फोनवरून घटनाक्रम सांगितला.

Web Title: Minor girl tortured by father in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.