'मिरॅकल ऑन व्हील्स'; दिव्यांग कलाकारांनी सादर केला भारताचा देदिप्यमान इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:45 AM2021-12-24T06:45:00+5:302021-12-24T06:45:01+5:30

Nagpur News नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे डॉ. सय्यद पाशा यांच्या 'मिरॅकल ऑन व्हील्स' च्या चमूने ''संस्कृती उत्सव' सादर केला.

'Miracle on Wheels'; Divyang artists present the glorious history of India | 'मिरॅकल ऑन व्हील्स'; दिव्यांग कलाकारांनी सादर केला भारताचा देदिप्यमान इतिहास

'मिरॅकल ऑन व्हील्स'; दिव्यांग कलाकारांनी सादर केला भारताचा देदिप्यमान इतिहास

Next
ठळक मुद्देव्हीलचेअरवरील प्रस्तुतीने खिळले प्रेक्षकांचे नेत्र

नागपूर : मनात ठरविले तर कुठलीही गाेष्ट अशक्य नाही, हे पुन्हा एकदा दिव्यांग कलावंतांनी खासदार महाेत्सवात दाखवून दिले. कुणी व्हीलचेअरवर तर कुणी काखेत कुबड्या घेऊन नृत्यासह असे काही सादरीकरण केले की प्रेक्षकही अचंबित राहिले. या दिव्यांग कलावंतांनी भारताचा साहित्य, कला, संस्कृती, शौर्यगाथा यांचा देदीप्यमान व अभिमानास्पद इतिहास अतिशय आकर्षकपणे सादर करून नागपूरकरांना अनाेखी अनुभूती दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या पटांगणावर डॉ. सय्यद पाशा यांच्या 'मिरॅकल ऑन व्हील्स' च्या चमूने ''संस्कृती उत्सव' सादर केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी 'कल्चर ऑन व्हील्स' चे प्रदर्शन घडवले.

यात नागपूरच्या २४ कलाकारांचाही समावेश हाेता. सुरुवातीला दिव्यांग कलाकारांनी एकदंताय वक्रतुंडाय ही गणपती वंदना प्रस्तुत केली. तीन टप्प्यात विभागलेल्या या कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात भारतीय कला, संस्कृती, साहित्याचे दर्शन घडवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जालियनवाला बाग हत्याकांडातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडियासह स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात देशाने केलेल्या प्रगतीचा आलेख प्रस्तुत करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सुरुवातीला कांचनताई गडकरी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सातव्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नीरीचे संचालक अतुल वैद्य, संगीत सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, उद्योगपती जयसिंग चौहान, डॉ. विनोद आसुदानी, आरबीआयचे राजेश आसुदानी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय बजाज, ज्येष्ठ समाजसेवक नामदेव बर्गर, नृल हसंजी, विजय मुनिश्वर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर उपस्थित हाेते. संचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.

पंतप्रधान मोदीही अवतरले

दिव्यांग कलाकरांनी सादर केलेल्या 'सांस्कृतिका उत्सव' पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा अतिशय कल्पक रितीने कॉमेंट्री सारखा वापर करत डॉ. सय्यद पाशा यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती.

Web Title: 'Miracle on Wheels'; Divyang artists present the glorious history of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.