१.०२ लाख रुपयांच्या साहित्याची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:12 AM2021-04-30T04:12:35+5:302021-04-30T04:12:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : वितरकाने दाेन वेगवेगळ्या साईडवर लाेखंडी सळाकी पाठविल्या. मात्र, या दाेन्ही साईडवर कमी सळाकी पाेहाेचविण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : वितरकाने दाेन वेगवेगळ्या साईडवर लाेखंडी सळाकी पाठविल्या. मात्र, या दाेन्ही साईडवर कमी सळाकी पाेहाेचविण्यात आल्या. ही अफरातफर ट्रेलर चालक व क्लीनरने केल्याचे लक्षात येताच त्यांच्यावरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. या सळाकींची किंमत १ लाख २ हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
दिगंथ नरेश साेनी (३५, रा. गणेशपेठ, नागपूर) हे लाेखंडी सळाकी वितरक आहेत. ते रायपूर (छत्तीसगड) येथील न्यू वलिया ट्रान्सपाेर्ट कंपनीच्या सीजी-०७/एनए-३२७७ क्रमांकाच्या ट्रेलरने संबंधितांना सळाकी पाठवायचे. त्यांनी याच ट्रेलरने पी. व्ही. आर.कंपनीला ब्राह्मणी, ता. उमरेड येथे तर दिघाेरी (काळे) येथील साईडवर एकूण ५५० टन सळाकी पाठविल्या. या सळाकींची एकूण किंमत ३ काेटी ३० लाख रुपये आहे. मात्र, प्रत्येक खेपेत पाच ते सहा टन सळाकी कमी येत असल्याची तक्रार पी. व्ही. आर. कंपनीच्या व्यवस्थापकाने दिगंथ साेनी यांच्याकडे केली हाेती.
याबाबत त्यांनी ट्रेलरचालक व क्लीनरवर संशय व्यक्त केला हाेता. त्यातच आठवडाभरापूर्वी सीजी-०७/एनए-३२७७ क्रमांकाचा ट्रेलर त्यांना दिघाेरी (काळे) येथील साईडवर उभा दिसला. मात्र, चालक व क्लीनर पळून गेले हाेते. त्यांनी त्या ट्रेलरमधील सळाकींचे माेजमाप केले असता, त्यात त्यांना १,७०० किलाे सळाकी कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या सळाकींची किंमत १ लाख २ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी ट्रेलरचालक व क्लीनरविरुद्ध भादंवि ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार जयसिंगपुरे करीत आहेत.