मनपा आयुक्तांची दिशाभूल

By admin | Published: September 29, 2015 04:39 AM2015-09-29T04:39:48+5:302015-09-29T04:39:48+5:30

गडरलाईन तुंबल्यानंतर तक्रार केली तर मनपाचे सफाई कर्मचारी ती साफ करतात. परंतु किंग्जवे मार्गावरील सेंट्रल

Mismanagement of the Municipal Commissioner | मनपा आयुक्तांची दिशाभूल

मनपा आयुक्तांची दिशाभूल

Next

नागपूर : गडरलाईन तुंबल्यानंतर तक्रार केली तर मनपाचे सफाई कर्मचारी ती साफ करतात. परंतु किंग्जवे मार्गावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना गेल्या दोन आठवड्यापासून गडरलाईनच्या दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बँक कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना मनपा मुख्यालयात विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत आहेत. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी तुंबलेली गडरलाईन साफ न करताच साफ केल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देऊ न त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
दोन आठवड्यापासून गडरलाईन तुंबल्याची समस्या न सुटल्याने बँके चे सहायक प्रबंधक आर.बी. सोनवणे यांनी यासंदर्भात थेट श्रावण हर्डीकर यांच्याकडे २२ सप्टेेंबरला तक्रार केली. याची प्रतिलिपी आरोग्य विभागालाही पाठविण्यात आली. तसेच मंगळवारी झोन व विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आल्या. परंतु तक्रारीनंतरही समस्या न सुटल्याने सोनवणे मनपा मुख्यालयात आले. त्यांनी हर्डीकर यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. परंतु नेहमीप्रमाणे बैठकीत व्यस्त असल्याचे कारण सांगून भेटण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर सोनवणे आरोग्य विभागात पोहचले. परंतु हे प्रकरण बांधकाम विभागाशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते कार्यकारी अभियंता वारके यांच्याकडे गेले.
परंतु ही समस्या राज्य सरकारच्या बांधकाम विभागाशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. वारके यांनी बँकेला भेट देऊ न माहिती जाणून घेतली. परंतु तुंबलेली गडरलाईन साफ क रण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नाहीत. दरम्यान, समस्या कायम असतानाही सोनवणे यांच्या मोबाईलवर आयुक्तांनी मेसेज पाठविला की, तुमची समस्या सोडविण्यात आली. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनीही बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. रस्त्यालगतचे चेंबर उघडण्यासाठी बांधकाम विभागाच्या अनुमतीची गरज असल्याचे चुकीचे सांगण्यात आले. वास्तविक ही मनपाचीच जबाबदारी असून मनपालाच सर्व अधिकार आहेत. (प्रतिनिधी)

प्रभागाचे सदस्य आहेत कुठे?
ही बँक सिव्हिल लाईन प्रभागात येत असल्याने प्रभागाच्या नगरसेवकांकडे बँक कर्मचाऱ्यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांचे कार्यालय गाठले. परंतु भेटच होत नसल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.

Web Title: Mismanagement of the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.