चुकी नासुप्रची, सुधारली मनपाने

By admin | Published: December 30, 2015 03:21 AM2015-12-30T03:21:14+5:302015-12-30T03:21:14+5:30

अगोदर ज्या जागेवर नासुप्रने बांधकामास मंजुरी प्रदान केली, तीच जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली.

Missed Nupurachi, improved manipane | चुकी नासुप्रची, सुधारली मनपाने

चुकी नासुप्रची, सुधारली मनपाने

Next

बांधकामाला दिली मंजुरी नंतर टाकले आरक्षण
नागपूर : अगोदर ज्या जागेवर नासुप्रने बांधकामास मंजुरी प्रदान केली, तीच जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जागा आरक्षित असल्यामुळे संबंधित जमीन मालकाच्या मनपापासून नगररचना मंत्रालयापर्यंत चकरा मारून झाल्या.
मौजा बोरगाव येथील १२८९.४८ वर्ग मीटर जागेला क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. नगररचना विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित प्रकरणात मनपाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित प्रस्ताव मनपाच्या आमसभेत आज सादर करीत त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी सभागृहाला सांगितले की, नासुप्रने संबंधित ले-आऊटला १९८४ मध्ये मंजुरी प्रदान केली होती. परंतु २००१ मध्ये सादर करण्यात आलेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये संबंधित जमिनीला आरक्षित केले होते. संबंधित जागेवर बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी यावर आक्षेप नोंदविला. राज्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
याच्या नियमितीकरणावर काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. परंतु महापौर प्रवीण दटके यांनी कायद्यानुसार प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली जावी, असे स्पष्ट केले. प्रस्तावाला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. (प्रतिनिधी)

डीपी रोडचा प्रस्ताव परत
जुना भंडारा रोड ते मेयो रुग्णालय चौक व्हाया शहीद चौक ते सुनील हॉटेल चौकपर्यंत १८ मीटरच्या डीपी रोडसाठी जमीन संपादित करावी लागेल. यासाठी २९४ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. मनपाने आतापर्यंत डीपी रोड किंवा इतर कुठल्याही प्रकल्पासाठी इतका मोठा निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे महापौर प्रवीण दटके यांनी हा प्रस्ताव प्रशासनाला परत पाठविला.

वाहन आणि मशीन वॉर्ड फंडातून खरेदी करा
धरमपेठ झोनच्या वॉर्ड फंडातून एक जेसीबी आणि एक चोकेज मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. यावर ८० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रकारे हनुमाननगर झोनच्या वॉर्ड फंडातून ३२ लाख रुपये खर्च करून सिवर क्लिनिंग जेटिंग मशीन आणि लकडगंज झोनच्या वॉर्ड फंडातून ४२ लाख रुपये खर्च करून सिवर क्लिनिंग व जेटिंग मशीन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली. महापौर दटके प्रस्तावांना मंजुरी प्रदान करीत म्हणाले की, वॉर्ड फंड हा नगरसेवकांचा असतो. तरीही नागरिकांच्या हितासाठी उपकरणांच्या खरेदीसाठी हा निधी खर्च करण्याचा प्रयत्न हा अभिनंदनीय आहे.

Web Title: Missed Nupurachi, improved manipane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.