जेवणाच्या ताटावरून उठून गेलेली अल्पवयीन मुलगी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 20:13 IST2022-07-26T20:12:36+5:302022-07-26T20:13:22+5:30
Nagpur News सायंकाळी ऐन जेवायच्या वेळी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पांढरपेशा भागात ही घटना घडली आहे.

जेवणाच्या ताटावरून उठून गेलेली अल्पवयीन मुलगी गायब
नागपूर : सायंकाळी ऐन जेवायच्या वेळी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पांढरपेशा भागात ही घटना घडली आहे.
संबंधित मुलगी ही तिचा भाऊ व वहिनीसोबत राहते. २४ जुलै रोजी भाऊ काही कामानिमित्त गावाला गेला होता. सायंकाळच्या वेळी वहिनीने तिला जेवायला हाक मारली. सर्व जेवायला बसत असताना मी मात्र नंतर जेवते, असे म्हणून १७ वर्षीय मुलगी घराबाहेर गेली. बराच वेळ झाल्यावरदेखील ती न आल्याने तिच्या वहिनीने परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती न आढळल्याने अखेर तिने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा नोंदविला आहे.