मिशन अ‍ॅडमिशन दूर करेल टेन्शन

By Admin | Published: February 12, 2017 02:27 AM2017-02-12T02:27:37+5:302017-02-12T02:27:37+5:30

शाळांमधील प्रवेशांची लगबग सुरू झाली आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे

Mission Admission will remove tension | मिशन अ‍ॅडमिशन दूर करेल टेन्शन

मिशन अ‍ॅडमिशन दूर करेल टेन्शन

googlenewsNext

लोकमतचा विशेष उपक्रम : मुलांचा सर्वांगीण विकास आता एकाच छताखाली
नागपूर : शाळांमधील प्रवेशांची लगबग सुरू झाली आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे. कुठल्या शाळेत प्रवेश द्यायचा, त्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी काय वेगळे करायचे, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे आहेत. पालकांच्या याच चिंतेला दूर सारण्यासाठी लोकमत एक विशेष उपक्रम राबवत असून या उपक्रमांतर्गत ‘स्कूल एक्सपो’ आणि ‘मिशन-अ‍ॅडमिशन-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी या काळात रामगोपाल माहेश्वरी भवन हॉल, झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. लोकमत आणि सेंट पॉल स्कूलद्वारे आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार, या उपक्रमादरम्यान उन्हाळी शिबिराबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी प्रशिक्षण, विविध शाळा व शाळांमधील प्रवेशाची सर्वंकष माहिती दिली जाईल. या तीन दिवसीय प्रदर्शन व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमात पालक आपल्या मुलांच्या करिअर संबधित आवश्यक ती सर्व माहिती मिळवू शकातात. पालकांच्या मनात जर कुठल्या शंका असतील तर त्या शंकांचे निरसनही येथे केले जाईल.(प्रतिनिधी)

यांना सहभागी
होता येईल
या उपक्रमात नामांकित शाळा, प्री नर्सरी, प्रायमरी, डे-स्कूल, एनिमेशन इन्स्टिट्यूट, अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स अकॅडमी, करिअर गायडन्स अकॅडमी, म्युझिक अ‍ॅण्ड आर्ट क्लासेस, डान्स क्लासेस, स्पोकन अकॅडमी, अ‍ॅबेकस, मेमोरी टेक्निक्स, मार्इंड पॉवर, पर्सनालिटी डेव्हलपमेंट यासरख्या संस्थासुद्धा यात सहभागी होऊ शकतात.

मर्यादित स्टॉल उपलब्ध
या भव्य उपक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. येथे विद्यार्थ्यांची शिक्षा व प्रशिक्षणासाठी अनेक प्रतिष्ठान आणि संस्था स्टॉल लावायला इच्छुक आहेत. परंतु स्टॉल मर्यादित असल्याने इच्छुक संस्थांना वेळेआधी आपल्या स्टॉलचे बुकिंग करावे लागेल. स्टॉलचे बुकिंग व याबाबत अधिक माहितीसाठी लोकमत भवनातील इव्हेंट्स कार्यालयात किंवा ९८८१७४८७९०, ९८२२४०६५६२ या क्रमांकांवर संपर्क केला जाऊ शकतो.

Web Title: Mission Admission will remove tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.