नरखेड तालुक्यात मिशन कोरोनामुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:14+5:302021-05-13T04:09:14+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात लसीकरण आणि कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार ...
जलालखेडा : नरखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात लसीकरण आणि कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार गावागावात प्रशासनाच्या मदतीने लोकप्रतिनिधीही मैदानात उतरले आहे. उमठा, साखरखेडा, दावसा, खरबडी, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा येथील ग्राम पंचायततीत अलीकडेच मिशन कोरोनामुक्ती संदर्भात आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकीत गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावामध्ये निर्जंतुकीकरण, लसीकरण, चाचणी या तीन बाबीवर विशेष भर देण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य सलील देशमुख, प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, माजी उपसभापती वैभव दळवी, पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर, सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडूपंत उमरकर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, अतुल पेठे, विघे गुरुजी, खंड विकास अधिकारी प्रशांत मोहोड, तालुका वैद्यकीय अधिकारी विद्यानंद गायकवाड, प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.