युवा संशोधक घडविण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’

By admin | Published: January 12, 2015 01:06 AM2015-01-12T01:06:22+5:302015-01-12T01:06:22+5:30

‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या

'Mission Innovation' to create a young researcher | युवा संशोधक घडविण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’

युवा संशोधक घडविण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’

Next

नागपूर विद्यापीठ : महाविद्यालयीन स्तरावर प्रोत्साहन देण्याचा मानस
नागपूर : ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाचे नाव अग्रक्रमावर रहावे यासाठी विद्यापीठाकडून धोरण आखण्यात येत आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमधील युवा संशोधकांचा ‘आविष्कार’ करण्यासाठी विद्यापीठातर्फे भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांतर्फे देण्यात आली आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’साठी तयारी करण्यासाठी विद्यापीठाला फारच थोडा वेळ मिळाला होता.
प्रथमच यात सहभागी होत असतानादेखील कमी वेळात तयार करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी दाद दिली. विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळाला आहे अन् जर विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी दिला तर निश्चितच दर्जेदार संशोधन प्रकल्पांची निर्मिती होणे शक्य आहे, असा विचार विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडण्यात आला.

Web Title: 'Mission Innovation' to create a young researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.