मिशन मेट्रो; नागपूरच्या मध्यवर्ती सीताबर्डी भागात काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:45 AM2019-02-21T10:45:02+5:302019-02-21T10:45:43+5:30
मेट्रो रेल्वेचे काम सध्या नागपुरात मोठ्या तातडीने पूर्ण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मेट्रो रेल्वेचे काम सध्या नागपुरात मोठ्या तातडीने पूर्ण केले जात आहे. गेले दोन दिवस खापरी ते काँग्रेसनगरपर्यंत ट्रायल रन पार पडली असून उर्वरित काम लवकरात लवकर कसे करता येईल, यावर भर दिला जात आहे. बर्डीतील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या ब्रिजचे काम युद्धस्तरावर केले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथे रात्रंदिवस काम सुरू ठेवण्यात आले आहे. दिवसा वाहतुकीचा खोळंबा होऊ नये तसेच अपघात होऊ नये म्हणून कामाचा वेग कमी असतो. मात्र रात्री १० नंतर या कामाला अधिक गती येते.
सीताबर्डी भागातून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष या कामाकडे नकळतच वेधले जाते. काहीजण बराच वेळ रस्त्याच्या कडेला थांबून हे काम कसे चालते याचे कुतुहलाने निरीक्षण करीत असतात.