‘टेक्नोसॅव्ही’ विद्यापीठ काणेंचे मिशन

By admin | Published: April 8, 2015 02:30 AM2015-04-08T02:30:42+5:302015-04-08T02:30:42+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदभार स्वीकारण्याअगोदरच पुढील पाच वर्षांचा ‘रोडमॅप’ तयार करून ठेवला आहे.

The mission of 'Technosavi' Kanane University | ‘टेक्नोसॅव्ही’ विद्यापीठ काणेंचे मिशन

‘टेक्नोसॅव्ही’ विद्यापीठ काणेंचे मिशन

Next

विशेष मुलाखत
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदभार स्वीकारण्याअगोदरच पुढील पाच वर्षांचा ‘रोडमॅप’ तयार करून ठेवला आहे. जागतिक पातळीवर आज तंत्रज्ञानाचाच बोलबाला असून त्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाला ‘टेक्नोसॅव्ही’ करण्याचे ‘मिशन’ घेऊनच रुजू होणार असल्याची माहिती डॉ.काणे दिली. मंगळवारी सायंकाळी डॉ.काणे यांनी कुलगुरुपदाचे नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीबाबतचे ‘व्हिजन’ बोलून दाखविले.
परीक्षा पॅटर्न बदलणे हे ‘ड्रीम’
विद्यापीठ व विद्यार्थी या दोघांसमोर परीक्षा प्रणालीमुळे विविध समस्या निर्माण होतात. विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर परीक्षांचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे अनेकदा नकळत काही त्रुटी राहतात व विद्यार्थ्यांना फटका बसतो. त्यामुळे नागपूर विद्यापीठात सुटसुटीत व सोपी परीक्षा प्रणाली अमलात आणण्याचे सर्वात मोठे ‘ड्रीम’ आहे. पहिल्या दोन वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयातच घेण्यात याव्यात यासाठी प्रयत्न असेल, असे प्रतिपादन डॉ. काणे यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी ‘टोल फ्री’ क्रमांक
नागपूर विद्यापीठाची विद्यार्थ्यांमध्ये फारशी चांगली प्रतिमा नाही, असे त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसून येते. मी प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर नसतानादेखील विद्यार्थ्यांचे मला समस्यांबाबत फोन यायचे. ही माझी जबाबदारी नाही, असे उत्तर मला देता येऊ शकत होते. परंतु त्यांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांची अडचण लक्षात यायची. त्यांची समस्याच ऐकून घ्यायला कुणी तयार नाही. नेमकी कुणाकडे समस्या मांडावी हे सांगणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार नाही अशी प्रणाली उभारण्याची गरज आहे. सर्वात प्रथम तर विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक सुरू करण्याचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळेल, अशी माहिती डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

Web Title: The mission of 'Technosavi' Kanane University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.