रेल्वेची चूक, प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:55+5:302021-07-04T04:06:55+5:30

नागपूर : सायंकाळी पुण्याला जाणारी रेल्वे रद्द झाल्याचे मॅसेज प्रवाशांना केल्यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ केली. परंतु पुन्हा ...

The mistake of the train, annoying the passengers | रेल्वेची चूक, प्रवाशांना मनस्ताप

रेल्वेची चूक, प्रवाशांना मनस्ताप

Next

नागपूर : सायंकाळी पुण्याला जाणारी रेल्वे रद्द झाल्याचे मॅसेज प्रवाशांना केल्यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ केली. परंतु पुन्हा तासाभरानंतर ही गाडी नियमित वेळेनुसार धावणार असल्याचा मॅसेज आल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नियोजित वेळेनुसार शनिवारी सायंकाळी सहा वाजता रवाना होणार होती. परंतु दुपारी दीडच्या सुमारास प्रवाशांना गाडी रद्द करण्यात आल्याचे मॅसेज मिळाले. जाणे आवश्यक असलेल्या प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासह पर्यायी व्यवस्थेसाठी धावपळ केली. अनेकांनी परिश्रम घेत दुसऱ्या गाडीचे तिकीट मिळविले. पहिल्या मॅसेजला एक तास होण्यापूर्वीच पुन्हा तीच गाडी धावणार असल्याचे मॅसेज प्रवाशांना मिळाले. काही प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर येऊन विचारणा केली असता, गाडी रद्द करण्यात आली नसून नियोजित वेळेनुसार धावणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही तांत्रिक चुकीमुळे हा गोंधळ झाल्याचे मान्य केले.

............

Web Title: The mistake of the train, annoying the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.