आयएसआयचा दुरुपयोग, वर्षभरात फक्त चार कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:23+5:302021-03-25T04:09:23+5:30

वसीम कुरेशी नागपूर : विदर्भासह नांदेड आणि सिंगोलीपर्यंत......................... कार्यक्षेत्र असलेल्या भारतीय मानक ब्यूरोने वर्षभरात आयएसआय मार्कच्या दुरुपयोगाशी संबंधित फक्त ...

Misuse of ISI, only four actions in a year | आयएसआयचा दुरुपयोग, वर्षभरात फक्त चार कारवाया

आयएसआयचा दुरुपयोग, वर्षभरात फक्त चार कारवाया

Next

वसीम कुरेशी

नागपूर : विदर्भासह नांदेड आणि सिंगोलीपर्यंत......................... कार्यक्षेत्र असलेल्या भारतीय मानक ब्यूरोने वर्षभरात आयएसआय मार्कच्या दुरुपयोगाशी संबंधित फक्त चार कारवाया केल्या आहेत. यातील दोन कारवाया २०२० मधील असून दोन कारवाया २०२१ च्या जानेवारी आणि मार्चमधील आहेत. या आर्थक वर्षातील केवळ निम्मे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

बीआयएसने मागील वर्षात २२ ऑक्टोबरला संभाजीनगर, नरसाळा येथे नंदिनी एंटरप्रायजेसमध्ये बनावट सीलबंद पाणी बॉटल तयार करून त्यावर आयएसआय मार्क लावण्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्याच वर्षी ५ नोव्हेंबरला गणेश गौरी प्रतिष्ठानमध्ये पीव्हीसी पाईपवर आयएसआय मार्कचा उपयोग केल्याचे प्रकरण शोधले होते. १५ जानेवारी २०२१ ला दुरखेड़ा, बोरगावमधील संकल्प जल उद्योगाचा परवाना दोन वर्षापूर्वी संपल्यावरही आयएसआय मार्कचा उपयोग सीलबंद पाणी बॉटलसाठी केला जात होता. १२ मार्चला पिवळी नदी येथील वासन इंडस्ट्रीमध्ये विनापरवाना पीव्हीसी पाईपवर आयएसआय मार्कचा वापर केल्याचे उघडकीस आणले होते.

...

या आर्थिक वर्षात चार कारवाया करण्यासोबतच पाच ग्राहक जागृती कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. हॉलमार्क जागरूकता शिबिरेही घेतली. आयएसआय मार्कचा दुुरुपयोग होत असल्यास बीआयएसच्या मेल आयडीवर आपला संपर्क क्रमांक देऊन कळवावे.

- विजय नितनवरे, प्रमुख, बीआयएस नागपूर

...नेटवर्क कमजोर

बीआयएस नागपूरचा व्याप आणि कार्यक्षेत्र मोठे आहे. मात्र या तुलनेत कर्मचारी फारच कमी आहेत. परिणामत: कारवायांची संख्याही कमी आहे. बीआयएस नागपूरमध्ये चार तांत्रिक स्टाफ हवा. मात्र येथे तीनच व्यक्ती आहेत. नॉन टेक्निकल स्टाफ आठ ऐवजी तीन आहे. शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्याही वाढली. मात्र आयएसआय मार्क हॉलमार्क आणि उत्पादकता प्रमाणपत्राशी संबंधित गुप्त माहिती मिळविण्यात बीआयएस बरेच कमजोर दिसत आहे.

...

Web Title: Misuse of ISI, only four actions in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.