‘एमकेसीएल’चे ‘वेलकम’ विनामूल्य

By admin | Published: May 8, 2016 03:13 AM2016-05-08T03:13:07+5:302016-05-08T03:13:07+5:30

महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) तीन दिवसीय ‘एमएच-सीआयटी वेलकम’ या विनामूल्य कोर्सचे आयोजन १२ मेपासून

'MKCL's' Welcome' is free | ‘एमकेसीएल’चे ‘वेलकम’ विनामूल्य

‘एमकेसीएल’चे ‘वेलकम’ विनामूल्य

Next

तीन दिवसीय आयोजन : क्लिक प्रोग्राम व परम् स्कूल कोर्स
नागपूर : महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) तीन दिवसीय ‘एमएच-सीआयटी वेलकम’ या विनामूल्य कोर्सचे आयोजन १२ मेपासून एमकेसीएलच्या राज्यातील ५ हजारांपेक्षा जास्त केंद्रावर करण्यात येणार असल्याची माहिती एमकेसीलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना आयटी कौशल्य तपासणी, अनुभव आणि कौशल्य गॅप भरून काढता येईल. कशा पद्धतीने शिकावे, यावर विश्वास निर्माण होईल. बाजारातील टूल्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत हा कोर्स शिकता येणार आहे.
याशिवाय कौशल्य विकासाचा क्लिक कोर्स (केएलआयसी) ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकता येईल. किमान शुल्क असलेले ३० कोर्सेस आहेत. हे कोर्सेस सर्व केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांना आवाहने सोडविण्याची संधी आहे. कोणताही कोर्स कृतीशिवाय शिकता येणार नाही, हे यातून कळून येईल. कोर्स पूर्ण करणाऱ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळेल. याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होईल.
स्वतंत्ररीत्या काम करताना रोजगारही उपलब्ध होणार आहे. तीन वर्षे पदवीचे शिक्षण पूर्ण करताना रोजगारासाठी विद्यार्थ्याने ४ ते ५ मॉड्युल पूर्ण करावेत, अशी अपेक्षा असल्याचे सावंत यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची डिजिटल शाळा या संकल्पनेनुसार ‘परम् स्कूल’ नावाने विशेष प्रकल्प १ जुलैपासून सुरू करण्यात येत आहे. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ही संकल्पना आहे. ३ ते ४ वर्षांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेता येईल. शालेय विद्यार्थ्यांना घरी बसूनही विशेष मॉड्युल पूर्ण करू शकेल.
संगणक साक्षरता उपक्रमांतर्गत देशाच्या ईशान्य भागातील सात राज्यांमध्ये एमकेसीएल इन्फा नावाने विशेष शाखा सुरू केली आहे. यावेळी पूर्व विदर्भाचे समन्वयक शशिकांत देशपांडे आणि कार्यक्रम समन्वयक अमित रानडे उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: 'MKCL's' Welcome' is free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.